You are currently viewing मळगाव मेटामध्ये भीषण अपघात

मळगाव मेटामध्ये भीषण अपघात

मळगाव मेटामध्ये भीषण अपघात; बाप-लेकीचा जीव संकटात

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर धावले मदतीला, तत्काळ रुग्णालयात दाखल करून वाचवले प्राण

सावंतवाडी

मळगाव येथील मेटा परिसरात सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात महादेव निरवडेकर (वय 60) आणि त्यांची मुलगी ममता निरवडेकर (वय 25) हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही डोक्याला, चेहऱ्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

महादेव निरवडेकर हे आपल्या मुलीसह मोटरसायकलने निरवडे येथील आपल्या गावी जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर ममता निरवडेकर हिने वडिलांना वाचवण्यासाठी मदतीसाठी जोरजोराने आक्रोश केला. मात्र घटनास्थळी जमलेला जमाव केवळ बघ्यांची भूमिका घेत होता, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.

दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर हे तात्काळ मदतीला धावून आले. त्यांनी स्वतःच्या गाडीमधून दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचवला. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर, रूपा मुद्राळे, रवी जाधव, लक्ष्मण कदम व गौरव रजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.

या सर्वांचे ममता निरवडेकर हिने मनःपूर्वक आभार मानले. अपघातग्रस्त महादेव निरवडेकर हे सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा