You are currently viewing समन्वयातून आंगणेवाडी जत्रोत्सव यशस्वी करुया! जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

समन्वयातून आंगणेवाडी जत्रोत्सव यशस्वी करुया! जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

समन्वयातून आंगणेवाडी जत्रोत्सव यशस्वी करुया! जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्लास्टिक मुक्त जत्रा संकल्पना राबविणार

भाविकांना कमी वेळेत दर्शन देण्याचे आंगणे कुटुंबीयांचे नियोजन

आंगणेवाडी

आंगणे कुटुंबीय आणि प्रशासन यांच्या सुयोग्य समन्वयातून जत्रोत्सव यशस्वी करायचा आहे. विविध विभागानी आपले कर्मचारी जत्रेदिवशी उपलब्ध ठेवावेत. आचार संहिता असल्याने प्रत्येक विभागाने आपले काम चोख बजावावे. भविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येकाने नियोजना प्रमाणे काम करावे. शासनाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ मंडळाशी समन्वय ठेऊन, अधिकाऱ्यांनी संवेदनशील पणे काम करावे. जत्रेदिवशी मतमोजणी असल्याने अतिरिक्त कर्मचारी मागणी वेळीच करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंगणेवाडी येथे केले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होतं आहे. विविध विभागाच्या जत्रा नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी दुपारी आंगणेवाडी येथे बैठक घेत घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अतिरिक्त पो. अधीक्षक नयोमी साटम, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, परिवहन अधिकारी श्री काळे, प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, बिडीओ शाम चव्हाण, डीवायएसपी घनशाम आढाव, तहसीलदार गणेश लव्हे, बाबू आंगणे, बाळा आंगणे, भास्कर आंगणे, अंनत आंगणे आदी उपस्थित होते.

महसूल विभाग पथक कार्यरत असणार : प्रांतधिकारी काळुशे –

महसूल विभागाच्या तयारी बाबत प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे म्हणाल्या, विविध दक्षता पथक स्थापन करण्यात आली आहेत. यात्रेपूर्वी अपत्कालीन विभागाची रंगीत तालीम घेण्यात येईल. दोन मंडळ अधिकारी, सहा तलाठी. नायब तहसीलदार यांचे तीन शिफ्ट मध्ये पथक असणार आहे. आंगणे कुटुंबीय चांगल्या प्रकारे गर्दी नियंत्रण करतात. पालकमंत्री नियोजनत्मक काम करून घेतात त्यामुळे जत्रा यशस्वी होते असे यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री सुकटे म्हणाले.

* भाविकांसाठी नऊ दर्शन रांगा –

भाविकांना नऊ दर्शन रांगा मधून दर्शन मिळणार आहे. अपंग आणि महनीय व्यक्तींसाठी वेगळी रांग असणार आहे. तसेच मुखदर्शन वेगळी रांग असणार असल्याची माहिती भास्कर आंगणे यांनी दिली. आचार संहिता असल्याने बॅनर लावण्या बाबत सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. महनीय व्यक्ती दर्शनाला जाताना चेंगरा चेंगरी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अपंगां साठी कणकवली व मालवण स्टॅन्ड कडून रिक्षा ठेवण्यात आल्या आहेत. मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छता राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

* संकल्पना प्लास्टिक मुक्त जत्रेची –

प्लास्टिक मुक्त यात्रा ही संकल्पना यावर्षी राबविण्याचे साईओ यांनी आवाहन केले असल्याबाबत सांगण्यात आले. यात्रा झाल्यानंतर स्वच्छता अभियान राबविताना गतवर्षी प्रमाणे नगरपालिका सफाई कर्मचारी देण्याची मागणी बाळा आंगणे यांनी केली.ग्रामपंचायत ने दुकान, हॉटेल परवानगी देताना प्लास्टिक बांदी बाबत सक्त सूचना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मसुरे बाजूने पार्किंग ठिकाणी योग्य नियोजन करावे अशी मागणी केली.

* आंगणेवाडीचा पाणी प्रश्न मिटवा-

आंगणेवाडी साठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा अशी मागणी भास्कर आंगणे यांनी केली. पाणी पूरवठ्या साठी दोन टँकर उपलब्ध होतील असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

* पोलीस बंदोबस्त सहा सेक्टर मध्ये –

पोलीस बंदोबस्त बाबत सहा सेक्टर करण्यात आले आहेत. मार्गांवर सतत पेट्रोलिंग असणार आहे. दोन वॉच टॉवर असणार आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे असे पोलीस निरीक्षक मारुती जगताप म्हणाले. एखादी गाडी रस्त्यात बंद पडल्यास ओढून नेण्यासाठी दोन क्रेन तैनात असणार असल्याची माहिती अधिकारी श्री काळे यांनी दिली.

* ग्रामपंचायत सज्ज –

शासनाच्या दोन सार्वजनिक विहिरी असून पाणी शुद्धीकरण झाले आहे. स्ट्रीट लाईट पूर्ण करण्यात येतील. स्वच्छता गृह सफाई पूर्ण करण्यात आल्या आहेत असे ग्रामसेवक युगल प्रभूगावकर यांनी सांगितले.

* 150 एसटी बसेस भविकांसाठी –

यावर्षी एसटी विभागाकडून 150 एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी असणार आहेत. पूर्वजनिक बांधकाम विभागाकडून आंगणेवाडी जोडणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत आहेत असे अभियंता अजित पाटील म्हणाले. बीएसएनएल कडून मोबाईल टॉवरची क्षमता वाढविण्यात येत असून पुढील वर्षी आंगणेवाडी मध्ये नवीन टॉवर उभारण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. अन्न औषध विभागकडून पाच पथक करण्यात आली आहेत. दोन दिवस पूर्वी अन्न नमुने तपासण्यात येणार आहेत.

* पाच किमी परिसरात ड्राय डे

उत्पादन शुल्क विभागा कडून 9 तारीख ला पाच किमी परिसरात ड्राय डे असणार आहे असे जाहीर करण्यात आले. वीज वितरण कंपनी कडून मुख्य लाईनचे मेंटेनन्स पूर्ण झाले आहे. तीन शिफ्ट मध्ये कर्मचारी काम करणार आहेत. अखंडीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शॉर्ट सर्किट झाल्यास फायर फायटर साहित्य ठेवण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. आपत्ती विभागाकडून दोन दिवस पूर्वी प्रशिक्षण देण्यात येईल.नगरपालिका कडून आठ मोबाइल टॉयलेट, चार अग्निशमक पुरवण्यात येणार आहेत.रात्री महाप्रसाद कार्यक्रम वेळेत देवलया बाहेरील मुख्य रस्त्यावर पेट्रोलिंग साठी पोलिस ठेवण्याची मागणी बाळा आंगणे यांनी केली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई लळीत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पुरवठा अधिकारी विजय सहारे, एसटी विभाग नियंत्रक दीपक धोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, मसुरे आरोग्य केंद्र डॉ. प्रियंका पाटील, डॉ. विणा मेहंदळे, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर, कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम विभाग पूजा इंगवले, अजित पाटील, मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, मसूरे पोलीस संजय हुंबे, तुषार वाघाटे, गणेश गोवेकर, वैभव वाळके, विलास गोवेकर, दीपक सलगर, राणी लाड, प्रकाश कात्रे,पोलीस पाटील पंकज आंगणे, अनंत आंगणे, दिनेश आंगणे, रामदास आंगणे, सतीश आंगणे, दिनेश आंगणे, तुषार आंगणे, सुधा आंगणे, नंदू आंगणे महेश आंगणे, शांताराम आंगणे, भरत आंगणे, समीर आंगणे आदी सह शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आभार बाळा आंगणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा