You are currently viewing पुढचा जन्म तुझ्याचसाठी

पुढचा जन्म तुझ्याचसाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुढचा जन्म तुझ्याचसाठी*

 

खरचं सांगू का…..

खरचं सांगतो कामाच्या धावपळीत

तुझ्यासाठी जगता आलं नाही

तुझ्यासोबत फारसं राहीलो नाही

तरी तू घर सांभाळले

मला लोकांसाठी धावायचं बळ दिले

पण….

शेवटी तुला वेळ द्यायचा राहून गेला,

 

शब्द होते ओठांवर हजारो,

पण एकदाही तुला मनातलं सांगता आले नाही.

तुझ्या डोळ्यांत वाट पाहणं होतं,

पण माझ्या वाटेवर मात्र गर्दी होती,

तू शांत उभी होतीस आयुष्यभर,

आणि मीच वेळेच्या मागे धावत होतो.

 

तुझ्या हसण्यात प्रेम होतं

तुझ्या नजरेत प्रतिक्षा होती

पण कर्तव्यांच्या वादळात

मी ते सुख जगू शकलो नाही.

खरचं तुझ्यासोबत राहता आलं नाही

 

आता मी गेल्यावर

मनात फक्त एकच हुरहूर‌ राहिली

जर वेळ परत मिळाली असती

तर प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जगलो असतो.

 

म्हणून देवा एकच प्रार्थना

जर पुन्हा जन्म लिहिला असेल

तर आयुष्याची प्रत्येक सकाळ

तिच्या नावाने उगवू दे.

 

या जन्मात राहिलेलं प्रेम,,

पुढच्या जन्मात पूर्ण करू दे,

शेवटी तुला वेळ द्यायचा राहून गेला…

पुढचा जन्म तुझ्याचसाठी.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा