*वैभववाडी महाविद्यालयात ७७ वा. प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
वैभववाडी
दि.३०/१/२६
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दि.२६ जानेवारी रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य व देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण प्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून तिरंग्याला मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एनसीसी कॅडेट्सनी आर्मी ड्रिल डेमो सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या डेमोमध्ये पहेलगाम अटॅक, सर्जिकल स्ट्राइक, टॅक्टिकल मूव्हमेंट यांसारखी विविध मिलिटरी प्रॅक्टिकल प्रात्यक्षिके शिस्तबद्ध व प्रभावीपणे सादर करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन व निरीक्षण एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट रमेश काशेट्टी यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी श्री. शरदचंद्र रावराणे, प्रमोद रावराणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव गवळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
