अनंत पिळणकर व चैतन्य सावंतांचा थेट मतदारांशी संवाद
कणकवली :
जिल्हा परिषद फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अनंत पिळणकर व पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत यांनी बिजलीनगर, पिंपळवाडी येथे घरोघरी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला.
या प्रचारात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, सौ. प्रतिभा अवसरे, शिवसेना तालुकाप्रमुख माधवी दळवी, संजना कोलते, शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे, सुरेश टक्के, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, देवेंद्र पिळणकर, प्रीतम राणे, तुषार पिळणकर, विजय ताईशेटे, अमित लाड तसेच महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
