You are currently viewing दुर्दैवी अंत एका कणखर नेतृत्वाचा

दुर्दैवी अंत एका कणखर नेतृत्वाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*दुर्दैवी अंत एका कणखर नेतृत्वाचा* 

 

 

२८ जानेवारी बुधवार , २०२६, साधारण १०ची वेळ! सहज हातात फोन घेतला, दुःखद निधन, भावपूर्ण श्रद्धांजली मजकूर वाचत वरचा फोटो पाहिला. डोळ्यावर विश्वास बसेना. घाईतच टी व्ही ऑन केला. सगळ्या चॅनलवर ती एकच अविश्वसनिय दुःखद बातमी दाखवत होते, मोबाईलवर चिटठी न कोई संदेश, तर कुठे दो पल रुका ख्वाबोका कारवां और फिर चल दिये तुम कहाँ हम कहाँ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सन्माननिय उपमुख्यमंत्री अजित पवार दादांच्या विमान दुर्घटनेची बातमी सुरू होती,. कानावर,डोळ्यावर , बातमीवर स्वतःवरही विश्वासच बसत नव्हता. दुर्दैवाने अशा बातम्या खऱ्याच असतात.

चार दिवसांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी VSR कंपनीच्या खाजगी विमानाने ते बारामतीला येत होते, हम सोचते है क्या और हो जाता है क्या? नियतीच्या खेळा पुढे आजवर कुणाचे चालले नाही. निघण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा ताईंशी बोलतांना संसदेत राष्टपतींचे भाषण नीट ऐकण्याची सूचना दिली आणि ते निघाले बारामतीला परंतु त्यांना दूरच्या प्रवासाला घेऊन जायला काळ टपून बसलेला होता!लँड होण्याच्या काही क्षण आधी त्यांच्या विमानाने पेट घेतला क्षणार्धात विमान जळून खाक झाले होत्याचे नव्हते झाले, त्याची झळ अर्थातच दिल्लीपर्यंत पोहचली. या बातमीने सारा देश हादरला!

वृद्ध, आजारी व्यक्तीचे जाणे कल्पना असूनही दुःखदायक असते. अजितदादांनी असे अकाली पुन्हा न येण्यासाठी जाणे त्यांच्या चाहत्यांना खूप क्लेशदायी आहे ! नेहमी सगळ्यांशी विनोद करत बोलणारे दादा इतके निष्ठुर कसे झालात हो? दादांचा शब्द म्हणजे पक्का वादा!जे बोलतील ते करतीलच असा सगळ्यांचा विश्वास! वचनांचा पक्का मनाचा सच्चा असा हा नेता बोले तैसा चाले ही वृत्ती , त्यामुळे सामान्य जनतेत खूप लोकप्रिय! अंत्यविधीला जमलेल्या अफाट जनसागरावरून ह्याची सहज कल्पना येते. त्यांनी नेहमी समाजकारणासाठीच राजकारण केलं , ते नेहमी म्हणत हे राजकारण लय वंगाळ त्यापेक्षा तुम्ही आपला संसार नेटका करा ,आनंदात रहा! राजकारणात आल्यावर अनेक महत्वाची पदे भुषविली सहकारक्षेत्रातूनराजकारणाची

सुरवात करणारे अजित दादा महाराष्ट्राचे पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले , अजितदादा दोस्तांचे दोस्त होते, जिथे जातील तिथे त्यांच्यावर प्रेम करणारे असत, त्यांचे एक हास्य, एक आश्वासन त्यांच्या चाहत्यांना दहा हत्तीचे बळ देत असे. त्यांना सांगितलेले काम पूर्णत्वाला जाणारच हा दृढ विश्वास लोकांच्या मनात असे, सामान्य कुटूंबात वाढलेल्या अजितदादांवर त्यांच्या आईने उत्तम संस्कार केले, गरीबाबद्दल कळवळा निस्वार्थ वृत्ती , ही त्यांचीं काही स्वभाववैशिष्ट्ये ! परंतु सर्वसाधारण लोकांच्या मनात मात्र पक्षनिष्ठा इतकी रुजलेली असते की ,दुसऱ्या पक्षातील नेत्यांची चांगली कामेही त्यांना दिसत नाही

विरोधासाठी विरोध हेच खरे !

अजितदादांची आणखी एक चांगली कार्यपद्धती म्हणजे ते रोज भल्या पहाटे उठून काम सुरू करीत, उद्या हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच. वक्तशीरपणा त्यांच्या रक्तात भिनलेला, त्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली ! आणखीही बरीच विकास कामे त्यांना करायची होती परंतु जन्म जसा आपल्या हातात नाही तसा मृत्यूही नाही, कल किसने देखा ?कुणाला ठाऊक होते की प्रचार सभेसाठी निघालेला हा नेता अंनताच्याच प्रवासाला निघून जाईल ? नाव जरी अजित असले तरी, कुणाच्याही मोहमायेत न अडकू देता विधात्याने त्यांना आपल्या सभेत तातडीने बोलावून घेतले, अजित दादा परत या परत या असं त्यांचे चाहते कितीही म्हणत राहिले तरी अजित दादा गेले ते पुन्हा न येण्यासाठी, त्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी कमीच! फक्त एव्हढेच म्हणू शकतो-

मनुष्य असतांना त्याच्या गुणांची कदर करा त्यांच्यावर प्रेम करा, माणसाने माणसासारखे वागावे.

माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर असणारे

मा, विदीप जोशी

पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी हे चारही ह्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांचे दुःख कोण समजणार? प्राणहानीच्या दुःखाला कोणतीच कसोटी लागू पडत नाही ईश्वरच हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो होच प्रार्थना!

पाचही जणांना भावपूर्ण श्रद्धांजली🌷🌷🌷🌷🌷

 

क्या लेके आया था, क्या लेके तू जायेगा? शेवटी

जाने वाले कभी नही आते

जाने वालेकी याद आती है

असं म्हणून मनाची समजूत काढायची एव्हढेच आपल्या हातात असते

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा