You are currently viewing माटणे जि.प.मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी होणार!

माटणे जि.प.मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी होणार!

माटणे जि.प.मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी होणार!

-आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार -प्रकाश कांबळे यांचा विश्वास.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचा मी अधिकृत उमेदवार म्हणून माटणे जिल्हा परिषद च्या सर्वसाधारण मतदार संघातून निवडणूक लढवित आहे,यात निश्चितपणे भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास आर.पी.आय.चे जिल्हा सरचिटणीस तथा उमेदवार -श्री.प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केला.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -मा.नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्ष राज्यात महायुतीचा घटक पक्ष असून मित्र पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही,जिल्ह्यात जि.प.किंवा पं.स.ची पक्षाला एकाही मतदार संघात जागा सोडली नसल्याने मी पक्षातर्फे स्वबळावर लढत आहे.
मी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव व पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षात कार्यरत राहून जनतेचे रस्ता,पिण्याचे पाणी,घरे,कर्जसुविधा,जात प्रमाणपत्र,शिक्षण व आरोग्यविषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला,प्रसंगी अन्यायकारक प्रश्नांवर आंदोलने,मोर्चा काढून प्रश्न मार्गी लावलेले आहेत.विकासकामे करण्यासाठी या मतदार संघातून जनता मला निश्चितपणे संधी देतील,असेही श्री कांबळे यांनी सांगितले.
पक्षाचे कोकण सहसचिव -शंकर जाधव(उसपकर),उपाध्यक्ष-ॲड.एस.के.चेंदवणकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव,जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती सासोलकर,सहसचिव-सौ.प्रगती कांबळे,पक्षाचे तालूकाध्यक्ष-रामदास कांबळे,तालूका कार्याध्यक्ष-प्रेमानंद पाल्येकर,जेष्ठ कार्यकर्ते -गुरुदास जाधव,तालूका उपाध्यक्ष-मनोहर जाधव,नकुल कांबळे यांच्या सहकार्याने लढत असल्याचे श्री.कांबळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा