अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीकडून नैतिक पाठिंबा, सत्ताधाऱ्यांवर टीका
कणकवली :
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अनंत पिळणकर यांनी प्रमोद सांगवेकर यांनी पैशाला बळी न पडता सत्ताधारी पक्षाविरोधात ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला. तसेच या मतदारसंघातील निवडणूक लढतीत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
सत्ताधारी भाजप व शिवसेनेबाबत जनतेमध्ये नाराजी असून सर्वसामान्य उमेदवारांच्या बाजूने जनमत झुकत असल्याचा विश्वास पिळणकर यांनी व्यक्त केला.
या वेळी निलेश राणे, रमेश राणे, उत्तम तेली, धकु गोठणकर, ठाकरे शिवसेना तालुकाध्यक्ष माधवी दळवी, संजना कोलते आदी उपस्थित होते.
