You are currently viewing गुरुश्री एज्युकेशन अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश :

गुरुश्री एज्युकेशन अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश :

*गुरुश्री एज्युकेशन अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश :**

सावंतवाडी

२५ जानेवारी २०२६, रविवार रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या गुरुश्री एज्युकेशन अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये,
इयत्ता ७ वी मधील कु. शौर्य चव्हाण व कु. पूर्वी आरोलकर यांनी प्रथम क्रमांकाचे स्थान, कु. हिना सारंग हिने तृतीय क्रमांक तर कु. आराध्या कुडव हिने चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. इयत्ता ६ वी मधील कु. रेहान सारंग द्वितीय क्रमांकाचे स्थान, इयत्ता ४ थी मधील कु. पवित्र शिंदे व कु. राझीन काजरेकर यांनी द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तर इयत्ता २ री मधील कु. राधा गवस हिने चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या पारितोषिकांसह प्रशालेत सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. कनिका राजपुरोहित व गुरुश्री अॅबॅकस अकॅडमीचे शिक्षक श्री. अविनाश भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा