*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*संपले माझे कार्य येथील*
आज निघालो तीर्थ यात्रेला
संपले माझे *कार्य येथील*
मनासारखे *वागून झाले*
कोण कशाला फोटो टांगतील…..1
मोकळी असूदे भिंत एखादी
लावून ठेवा तिवर *घड्याळ*
सदैव ऐकून टीक टीक त्याची
कळेल तुम्हाला झाली सकाळ….2
ठेवा विश्वास *डोळ्यावरती*
नका विसंबू *कानांवरती*
मर्यदा ओळखून सदैव आपली
हीच माझी “अखेरची” विनंती…….3
असते जे जै नशीबी आपल्या
आणून देते *नियती* मावशी
नका विनवू *आत्याबाईला*
रहाल *पदावाचून* उपाशी……..4
सांभाळून रहा *लुच्यांपासून*
*जमीनीवर* ठेवा पाय रोवून
घालून सत्तेचे *लाईफ जॅकेट*
*कष्टी* नेईल आपणा तारून……5
राजकारणात नसे कोणी आपले
भाजतो भाकरी प्रत्येक आपली
फिरवावी लागते करपण्याआधी
नाहीतर विझवा *चूल पहिली* ….6
विनायक जोशी🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
