“अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी” – नितेश राणे
*अजित दादांना मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
कणकवली :
तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे, त्यांना ताकद कशी द्यायची, त्यांच्यामागे कसे उभे राहायचे हे अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राला दाखवले आणि शिकवले. अशा शब्दात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांची काम पद्धती आम्ही ऐकली, पहिली, प्रशासनावर त्यांची असलेली पकड, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी या सर्व गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
