स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शास्त्रीय नृत्यामधील ‘कथ्थक’ या विषयामध्ये प्रारंभिक परीक्षेत शंभर टक्के निकाल
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये चालणाऱ्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ च्या प्रारंभिक परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांचा १००% निकाल लागला. यामध्ये इयत्ता ३ री मधील कु. क्रिशा साळवी हिने विशेष श्रेणी तर कु. ऋत्वी पेंडसे, कु. राधिका शेटकर, कु. राज्वी गोंदावळे, कु. अस्मि सावंत व आराध्या गावडे यांनी प्रथम श्रेणी पटकावली. इयत्ता ४ थी मधील कु. प्रार्थना नाईक व कु. अनोमा कामत यांनी विशेष श्रेणी तर, कु. पारिधी निकम हिने प्रथम श्रेणी प्राप्त केली. इयत्ता ५ वी मधील कु. ऐश्र्वर्या तेली, कु. धन्यवी शृंगारे, कु. जान्हवी तुळसकर यांनी विशेष श्रेणी तर कु. सई नाईक, कु. गायत्री तनावडे, कु. जान्हवी जानकर, कु. लावण्या केसरकर, कु. निलया शिंदे, कु. नुवैरा सैय्यद व कु. याश्विनी खवणेकर या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. अशाप्रकारे, वरील सर्व विद्यार्थिनींनी कथ्थक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याकरिता, प्रशालेच्या व नृत्यांगण कथ्थक क्लासेसच्या संचालिका सौ. कश्मिर ऋजुल पाटणकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर, संचालिका सौ. कश्मिरा पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
