कोलझर पं. स. मतदार संघातून गणेशप्रसाद गवस बिनविरोध विजयी
दोडामार्ग l प्रतिनिधी :
कोलझर पंचायत समिती मतदार संघातून शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. उबाठा शिवसेनेचे उमेदवार प्रवीण परब यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गणेशप्रसाद गवस बिनविरोध निवडून आले आहेत.
