You are currently viewing भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन व एआय/एमएल बूट कॅम्पचे उद्घाटन….

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन व एआय/एमएल बूट कॅम्पचे उद्घाटन….

_*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन व एआय/एमएल बूट कॅम्पचे उद्घाटन….*_

_*आयआयटी गोवा मार्फत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण….*_

सावंतवाडी

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “ड्रोन प्रणालींची मूलतत्त्वे व ड्रोन व्हिजनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा वापर” या विषयावर आयोजित पाच दिवसीय बूट कॅम्पचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. आयआयटी गोवा येथील सेंटर फॉर ड्रोन एप्लिकेशन्स विभागाचे वरिष्ठ संशोधक प्रा.डॉ.शरद सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर आयआयटी गोवाचे प्रा.डॉ.क्लिंट जॉर्ज, भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले उपस्थित होते._

_प्रास्ताविक डॉ.रमण बाणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग या क्षेत्रातील संधी स्पष्ट केल्या. प्रा.डॉ.शरद सिन्हा यांनी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व आयआयटी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा बूट कॅम्प आयोजित करण्यामागील भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची संस्कृती रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी विद्यार्थ्यांनी ड्रोन व एआयसारख्या तंत्रज्ञानात कौशल्य आत्मसात करून देशाच्या संरक्षण विकासात मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन केले. गजानन भोसले यांनी उद्योगाभिमुख व संशोधनकेंद्रित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत व्यक्त केले._

_हा पाच दिवसीय बूट कॅम्प ड्रोन सिस्टिम्स, एआय-एमएल आधारित व्हिजन, प्रात्यक्षिके व तांत्रिक सत्रांवर आधारित असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आला आहे. सूत्रसंचालन प्रा.सागर खानोलकर तर आभार प्रदर्शन प्रा.जितेंद्र आचार्य यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते._

प्रतिक्रिया व्यक्त करा