*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संविधान-हक्क आणि कर्तव्य*
स्वतंत्र भारतमातेचे आपण, गाऊ गौरवगान
उंच उंच फडकवू तिरंगा, आपल्या देशाचा अभिमान (धृ.)
वीर हुतात्मे जे होऊन गेले
स्वातंत्र्यास्तव प्राण अर्पिले
हासत हासत फासामध्ये,
अडकवली मान…
उंच उंच फडकवु तिरंगा…(१)
या देशाने आम्हां काय दिधले?
चिंतनीय आम्ही काय अर्पिले
सात पिढ्यांच्या ऐय्याशीस्तव
करीतो का जीवाचे रान?…
उंच उंच फडकवु तिरंगा…(२)
हक्क देणाऱ्या संविधानाची
जाणीव ठेवूया कर्तव्याची
लोकशाहीच्या मर्यादांचे
मनी ठेवूया भान…
उंच उंच फडकवु तिरंगा…(३)
देशभक्ती ही नसो प्रासंगिक
युद्धाचेही नको प्रात्यक्षिक
नितदिनी व्यवहार दर्शवी
देशसेवेचे परिमाण…
उंच उंच फडकवु तिरंगा…(४)
देश श्रेष्ठ असो स्वतःहून
नुरे अस्मिता स्व-देशाविण
स्वच्छ, सत्शील चारित्र्याचा
बनवू हिंदुस्तान…
उंच उंच फडकवु तिरंगा…(५)
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या स्वरचित कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
