विद्यार्थ्यांच्या विचारमंथनातून स्वातंत्र्यलढ्याचे स्मरण, देशप्रेमाची शपथ
कुडाळ :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये उत्साहात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नेताजींच्या कार्यावर आपले विचार मांडले. कु. अक्षता जाधव, कु. धनश्री कुपेरकर, ज्ञानदा मेस्त्री आणि भावेश मेस्त्री यांनी नेताजींचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, त्यांचे खंबीर नेतृत्व आणि आझाद हिंद सेनेचे योगदान यावर प्रभावी भाषणे केली.
नेताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची शपथ घेतली. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
