प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिंधुदुर्गनगरी,
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार आहे. हा मुख्य शासकीय सोहळा सोमवार, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे.
ध्वजारोहणानंतर सकाळी 9.30 ते 9.40 या वेळेत पोलीस दल व राखीव पोलीस दलाचे आकर्षक संचलन होणार असून या सोहळ्याला विशेष शिस्तबद्धतेचे स्वरूप लाभणार आहे.
मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 वाजता असल्याने जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व संस्थांनी आपापल्या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.30 पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सभारंभासाठी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सकाळी 8.45 वाजेपर्यंत आपापल्या जागांवर स्थानापन्न व्हावे तसेच राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
