You are currently viewing सावंतवाडीत १०८ सूर्यनमस्कारांचा भव्य महासंकल्प

सावंतवाडीत १०८ सूर्यनमस्कारांचा भव्य महासंकल्प

सावंतवाडीत १०८ सूर्यनमस्कारांचा भव्य महासंकल्प

रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त २५ जानेवारीला स्पर्धा; विजेत्यांना रोख बक्षिसे

सावंतवाडी

रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात १०८ सूर्यनमस्कारांचा भव्य महासंकल्प आयोजित करण्यात आला आहे. फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग आणि घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता आर. पी. डी. हायस्कूलच्या सभामंडपात हा उपक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ठरावीक वेळेत सर्वाधिक सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या साधकांना आयोजकांच्या वतीने रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी व योगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन योगशिक्षक शेखर बांदेकर, घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा कुमठेकर आणि मोहिनी मडगावकर यांनी केले आहे. या महासंकल्पात सहभागी होऊन आपली शारीरिक क्षमता आणि आत्मशक्ती आजमावण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा