You are currently viewing माजी सैनिकांच्या पाठपुराव्याला यश : कॅन्टीन सेवा अखेर पूर्ववत

माजी सैनिकांच्या पाठपुराव्याला यश : कॅन्टीन सेवा अखेर पूर्ववत

माजी सैनिकांच्या पाठपुराव्याला यश : कॅन्टीन सेवा अखेर पूर्ववत

​जिल्हा सैनिक पतसंस्थेकडून भौतिक सुविधांची उपलब्धता

​सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सी.एस्.डी. (CSD) कॅन्टीन सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध माजी सैनिक संघटनांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, ही सेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे. या सेवेच्या फलकाचे, नूतन वेटिंग हॉलचे आणि गोदामाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

​ ​कॅन्टीन सेवेच्या अधिकृत बोर्डाचे उद्घाटन जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष पद्मनाभ परब व जिल्हा सैनिक सेवा निवृत्त संघाचे प्रतिनिधी उमेेश कारिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्डधारकांसाठी नव्याने तयार केलेल्या वेटिंग हॉल व गोदामाचे उद्घाटन सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर व सैनिक कल्याण कार्यालयाचे निवृत्त अधिकारी उमेश आईर यांनी केले. तसेच, मुख्य कॅन्टीन हॉलचे उद्घाटन जे.सी.ओ. तानाजी जगताप, इंडियन एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर जोशी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.

​ ​सैनिकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेने या कॅन्टीन सेवेसाठी पुढाकार घेत बहुउद्देशीय हॉल, वेटिंग रूम आणि गोदामाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या योगदानाबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांचा माजी सैनिकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, कॅन्टीन जे.सी.ओ. तानाजी जगताप यांचाही सन्मान करण्यात आला.

​यावेळी चंद्रशेखर जोशी, उमेश कारिवडेकर, पद्मनाभ परब, उमेश आईर आणि धनंजय राऊळ यांसारख्या पाठपुरावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

​ ​या सोहळ्याचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले, तर प्रास्ताविक चंद्रशेखर जोशी यांनी मांडले. कार्यक्रमास दिनानाथ सावंत, चंद्रकांत शिरसाट, शशिकांत गावडे, सुभाष सावंत, शिवराम जोशी, बबनराव खोचरे, श्यामसुंदर सावंत, भिवा गावडे, मोहन राऊळ, अनंत सावंत, प्रकाश सावंत, राजाराम वळंजू, लक्ष्मण गवळी, दीपक परब, धनंजय राऊळ, श्री. माने, सौ. प्रिया कुडतरकर, सौ. आरोसकर, बाळकृष्ण लिंगवत, सुभाष कदम, विनायक शेट्ये, कृष्णा परब, व्हिक्टर पिंटो, मधुकर करमरकर, शांताराम खोचरेकर, चंद्रकांत खोचरे, मौनुद्दीन शेख, चंद्रकांत राऊळ, बापू वरक, शशिकांत मोरजकर, बाळकृष्ण गावडे, सुरेश गावडे, सखाराम ठाकूर, श्री. खरात, संतोष सावंत, सुनील गावडे, राजाराम शिंदे, श्रीराम आडणेकर, विठ्ठल गावडे, सुभाष नाखरे, सगुण पास्ते, यशवंत तावडे, अशोक म्हाडगुत, दीपक शेट्ये, जगन्नाथ परब, सहदेव राऊळ यांसह मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा