You are currently viewing फोंडाघाट हायस्कूलतर्फे मतदार जागरूकता दिंडी; मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन

फोंडाघाट हायस्कूलतर्फे मतदार जागरूकता दिंडी; मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन

फोंडाघाट हायस्कूलतर्फे मतदार जागरूकता दिंडी; मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन

फोंडाघाट

फोंडाघाट हायस्कूलच्या वतीने आज मतदार जागरूकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीचा कणा असलेला मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात बॅनर घेऊन बाजारपेठेतून एस.टी. स्टँड ते गांधी चौक असा रॅली मार्ग काढत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने जबाबदारीने वापरावा, मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, असा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे दिला. या उपक्रमाचे नियोजन शिक्षक श्री. लाकूळ गोसावी सर यांनी केले होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक अजित नाडकर्णी यांनी आपले परखड मत व्यक्त करताना, “मतदान करा असे सांगावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे,” असे स्पष्ट शब्दांत नमूद केले. त्यांनी नागरिकांना निष्क्रिय न राहता लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या दिंडीमुळे फोंडाघाट परिसरात मतदार जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा