You are currently viewing अनंत पिळणकरांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी
Oplus_16908288

अनंत पिळणकरांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी

श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन

 

कणकवली :

माघी गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील इंडी आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी फोंडाघाट विभागातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी घोणसरी गणेश मंदिर, वाघेरी गणेश मंडळ, गडगेसखल गणपती मंदिर, गांगोवाडी येथील मंगलमूर्ती सांस्कृतिक कला मंच तसेच कोरगावकरवाडी गणेश मंदिर येथे श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

दर्शनावेळी पिळणकर यांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. त्यांच्या सोबत फोंडाघाट पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत, तसेच सौ. अवसरे, सुरेश टक्के, रमेश राणे, सिद्धेश राणे, सौ. मिनल पिळणकर, श्रीमती अनिता पिळणकर, सौ. संजना कोलते, बाळकृष्ण मसुरकर, देवेंद्र पिळणकर, पार्थ पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पिळणकर यांचे स्वागत करण्यात आले. मंडळांनी उत्साहात पूजा-अर्चा, आरती, भजन-कीर्तन तसेच महाप्रसाद यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविकांनी श्रद्धेने तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

या निमित्ताने संपूर्ण फोंडाघाट विभागात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत उत्सव साजरा केल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विशेष कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा