कुडाळ (प्रतिनिधी) :
प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४१वा पुण्यतिथी उत्सव दि.२९ते ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू होत असून या कालावधीमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमासोबतच आरोग्य उपक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या ‘ वर्णावी ती थोरी”या लीलामातृचे सामुदायिक पारायणाने उत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. तद्वतच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीप बुवा मांडके रामदासी पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांची आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्य कार्यक्रमाला शनिवारी दि.३१जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून प्रारंभ होऊन नित्य काकड आरती ,सकाळी ९ ते१० या वेळेत राऊळ महाराज समाधी मंदिरात अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे त्यानंतर प.पू.विनायक अण्णा महाराज पादुका पूजन १०.३० ते ११.३० हरिपाठ – जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना व संगीत साधना ११.३० ते १२.३० नामस्मरण श्रीपत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगाव दुपारी १२.३० ते १ समाधीस्थळी महाराजांची महाआरती त्यानंतर दुपारी १ते रात्री ११ अखंड महाप्रसाद तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून वारकरी भजन मंडळे आपली सेवा राऊळ महाराज चरणी सादर करतील. रात्रौ ८ते १० या वेळेत प.पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होईल. ठिक ११ वाजता ‘लोकराजा ‘ सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेहरू यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग ” ब्रम्हसंकेत सादर होईल.तरी समस्त राऊळ भाविकांनी सदर पुण्यतिथी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी यांनी केले आहे.
