नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे संजय पडते यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या अर्ज सादर केला.
महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेला सुटला असून, संजय पडते यांच्या उमेदवारीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज दाखल करताना शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नेते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय पडते यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा मतदारसंघाच्या विकासासाठी होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
