वेताळबांबर्डे जि.प. मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे नागेश आईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कालच शिंदे शिवसेनेने अधिकृतपणे त्यांची उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्मचे वाटप केले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागेश आईर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
वेताळबांबर्डे मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत अपेक्षित असून, नागेश आईर यांच्या उमेदवारीमुळे शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
