सावंतवाडी:
श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज मठाधीपती श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, जिल्हा कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र माठेवाडा सावंतवाडी येथे सत्संग आनंद सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचनादी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व गुरुबंधू, भगिनींनी, भाविक भक्तगणांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, सावंतवाडी कार्यकारिणीने केले आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे, सकाळी 5.30 वा. काकड आरती, 9.00 वा. सकाळचे सांप्रदायिक भजन, 11.00 वा. दुपारचे सांप्रदायिक भजन, सायंकाळी 5.00 वा. कार्यक्रम स्थळी दिंडीच्या गजरात महाराजांचे आगमन, पाद्यपूजा, 6.00 वा. रात्रीचे सांप्रदायिक भजन, 7.00 वा. दासबोध वाचन, 8.00 वा. स्वामींच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचन, 9.00 वा. आरती, दर्शन आणि महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट माठेवाडा, सावंतवाडी संपर्क क्रमांक श्री.परशुराम पटेकर 9420408853, श्री.भगवान राऊळ 9422871768 यांच्याशी संपर्क साधावा.
