You are currently viewing फारकत ..तुझी..माझी..!

फारकत ..तुझी..माझी..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फारकत ..तुझी..माझी..!*

 

आता आपलं प्रेम

इथेचं थांबलेल बरं

ओहोटी लागण्यापूर्वीच

किनाऱ्यावर पोचलेलं बरं..!

प्रेमांत… तुझं माझं

असं ..कधीच नव्हतं

अंतरही तुझ्या माझ्यात

खरं तर कधीच नव्हतं ……..!

अंतरातही अभिमान होता

अहंकार कधीच नव्हता

आणि आपण त्यात कुणाचा

कित्ता गिरवला नव्हता…..!

चुकलो इथेच…प्रेमाला

मालमत्ता समजून बसलो

अन् ..एकमेकांना नकळत

हिस्सा.. मागू लागलो …….!

नकळत एकमेकांची

रिकामी स्पेस.. ओढू लागलो

तिथेच !मालकी हक्क सोडून

आपण भाडेकरी झालो……!

प्रेमांत मागणी असते…असते

ती पूर्ण करतांना अपमान नसतो

उगाचच मनाची

समजूत घालायला नको

उसवलेले धागे

पुन्हा जोडायला नको ……..!!

मनी जखमी झालो असलो जरी

फारकत घेतांना !नको कटुता उरी

आपले प्रेम खरे होते कां?

हो ..ते नेहमीच खरे होते

पण पूर्वी..आज नाही..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा