माजगाव जि. प. मतदारसंघात विक्रांत सावंत यांची उमेदवारी;
तरुण नेतृत्वाला जनतेचा वाढता पाठिंबा
सावंतवाडी
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विक्रांत सावंत यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. २० जानेवारी रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या घोषणेमुळे संपूर्ण मतदारसंघात नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्याची भक्कम ओळख निर्माण केलेले विक्रांत सावंत हे जनतेशी थेट संवाद, पारदर्शक कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनासाठी परिचित आहेत. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल नागरिकांकडून घेतली जात आहे.
भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी अधिक बळकट मानली जात आहे. प्रगतशील, सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक म्हणून विक्रांत सावंत यांच्याकडे पाहिले जात असून, मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांच्या कार्याचा ठसा आणि वाढता जनसमर्थन लक्षात घेता, येत्या निवडणुकीत विक्रांत सावंत यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
