You are currently viewing विज्ञान, गणित, इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश

विज्ञान, गणित, इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश

*विज्ञान, गणित, इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश* :-

सावंतवाडी

दि सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित आणि इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले. विज्ञान ओलंपियाड स्पर्धेत सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीचा विद्यार्थी कॅडेट अथर्व मोहिते, इयत्ता सातवी कॅडेट महादेव जाधव, कॅडेट शेवन परेरा, कॅडेट स्वराज पारकर या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. गणित ओलंपियाड स्पर्धेत इयत्ता सहावीचा विद्यार्थी कॅडेट अथर्व मोहिते, कॅडेट वेद बेळणेकर, कार्तिक साइल तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थी मधुस्पर्श कदम, सर्वेश गावडे, स्वराज पारकर इयत्ता आठवी कॅडेट द्विज खानोलकर, यज्ञेश डेगवेकर. इयत्ता नववी श्रीदत्त मेंगडे, ओम निकम आणि रुद्र शेट्ये यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. कॅडेट श्रीदत्त मेंगडे याची स्तर दोन साठी निवड झाली. इंग्लिश ओलंपियाड मध्ये इयत्ता सहावीचा कॅडेट अथर्व राठोड, अथर्व मोहिते आणि कॅडेट वेद बेळणेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. इयत्ता सातवीचे विद्यार्थी तनुष राऊत, सर्वेश गावडे तर इयत्ता आठवीचे विद्यार्थी चैतन्य पवार, तनिष्क मोरे, आरुष कोरगावकर, इयत्ता नववीचा दुर्वेश बागवे, मिहिर सावंत, दक्ष शेडगे यांनी सुवर्णपदक पटकावले. या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूलच्या तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक अध्यक्ष श्री सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे व सर्व संचालक सर्व पालक यांनी केले यशवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा