*दुर्मिळ ए निगेटीव्ह रक्तासाठी धावले सिंधू रक्तमित्र..*
*कळसुलीचे रुजाय फर्नांडिस ठरले जीवदान दाते*
कणकवली :
आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते, त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अपवाद ठरलेत ते कणकवली कळसुली येथील रुजाय फर्नांडिस. दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी संगीता प्रभू (मुटाट, देवगड) या पेशंटला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे *ए निगेटीव्ह* तातडीने रक्ताची गरज होती सिंधु रक्तमित्र कणकवली कार्यकारणी उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस यांनी गायत्री युवा प्रतिष्ठान कलमठ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये दुर्मिळ रक्तगटाचे अमूल्य रक्तदान केले. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून तब्बल १९ वेळा रक्तदान केले.
आहे तर २वेळा प्लेटलेटदान करून, रुग्णांना जीवदान दिले आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
रूजाय फर्नांडिस हे उत्स्फूर्तपणे सामाजिक कार्यात सहभागी होतात. तसेच अनेक संस्थांशी संलग्न होऊन त्यांनी विशेषतः अनेकांच्या सामाजिक समस्या तसेच रक्ताची असलेली गरज पूर्ण केली आहे. रक्तदान करण्यासाठी त्यांनी गोवा – बांबोळी, कोल्हापूर, एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अनेकदा रक्तदान केले आहे.
