You are currently viewing आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सुदन कवठणकर यांचे नाव चर्चेत
Oplus_16908288

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सुदन कवठणकर यांचे नाव चर्चेत

सावंतवाडी :

जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागताच आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचाली वेग आला आहे. शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुदन कवठणकर यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कवठणी गावातील अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामामुळे पक्षाकडून त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात आहे.

सुदन कवठणकर यांनी केवळ आपल्या गावापुरते मर्यादित न राहता सातार्डा, सातोसे, मडुरा आणि आरोंदा परिसरातील विविध गावांमधील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. दिवस-रात्र कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, विशेषतः तरुण वर्गामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवण्याची त्यांची भूमिका मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

राजकीय अनुभवाच्या बाबतीतही कवठणकर कुटुंबाचा उल्लेख केला जातो. त्यांच्या पत्नी सौ. सुमन कवठणकर यांनी यापूर्वी कवठणी गावच्या सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात गावाचा विकास घडून आल्याने, हा अनुभव आता संपूर्ण आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उपयुक्त ठरू शकतो, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

विशेष बाब म्हणजे सुदन कवठणकर यांच्या कार्यशैलीची दखल केवळ मित्रपक्षांनीच नव्हे तर विरोधकांनीही घेतली आहे. विकासकेंद्रित नेतृत्वाला संधी मिळाल्यास सहकार्य करण्याची तयारी विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांनीही दर्शवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाने या तरुण, लोकसंपर्क असलेल्या आणि कामातून विश्वास निर्माण केलेल्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी सूर आता आरोंदा मतदारसंघातून उमटू लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा