You are currently viewing श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन.

श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन.

श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन.

सावंतवाडी

शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलीत श्री जनता विद्यालय व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या विद्यमाने संस्थेचे माजी अध्यक्ष कै मधुकरराव बुगडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी प्रशालेला दिलेले योगदानाबद्दल व दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासोबत त्यांच्या विषयांची अद्ययावत माहिती देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन स्तरावरीलप्राध्यापकांच्या माध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार दिनांक 19. 1 .2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार आहे.
सोमवार दिनांक 19 1 2026 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गणेश मर्गज यांचे प्राणी वर्गीकरण या विषयावर तर इंग्रजी विभागाचे प्रा. विजय राठोड यांचे बोर्ड परीक्षा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे .मंगळवार दिनांक 20.1.2026 रोजी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. योगेश चौधरी यांचे अणुऊर्जा व ऊर्जेचे प्रकार याविषयी व्याख्यान होणार आहे. बुधवार दिनांक 21 1 2026 रोजी रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. दिलीप गोडकर यांचे पिरॉडिक टेबल या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार दिनांक 22.1.2026 रोजी रसायनशास्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब शिंदे यांचे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार व ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दिनांक 23.1.2026 रोजी गणित विभागाचे विभागप्रमुख डॉ.विश्वास सोनाळकर यांचे प्रोबॅबिलिटी आणि वेदिक मॅथ्स तर शनिवार दिनांक 24 .1 .2026 रोजी वनस्पती शास्त्राचे डॉ. उमेश पवार यांचे लाइफ प्रोसेसेस इंन लिविंग ऑर्गानिस्म या विषयावर व्याख्यान होणार आहे.
व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये पालक, ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी, संस्थेचे हितचिंतक यांनी उपस्थित रहावे व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रतापराव देसाई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा