शेती व शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय किसान संघ नेतृत्व करणार
सावंतवाडी
जैवविविधतेने नटलेल्या शेतीप्रधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदललेल्या पर्यावरणाने शेती आणि शेतकरी यांची स्थिती चिंतनीय झाली आहे. मनुष्यबळाची कमतरता, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी शेती सोडून शहराकडे चालला आहे. या परिस्थितीत भारतीय किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना रचनात्मक काम, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहे.
भारतीय किसान संघ करत असलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष मान. डॉ. विशाल चंद्राकर (छत्तीसगड), महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री श्री चंदन जी पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी सावंत, जिल्हा मंत्री श्री अभय भिडे व जिल्हा सहमंत्री श्री मनोहर ठिकार उपस्थित होते.
सिंधुदुर्गात भारतीय किसान संघाने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा.
रचनात्मक काम
* जनावरांचे विविध आजार व वनौषधीचा प्रभावी वापर याचे मार्गदर्शन. यासाठी वैद्य गवाणकर यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
* गोपालन विषयातील राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक डॉ.प्रशांत योगी यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर.
* शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव व थेट ग्राहक मिळवून देण्यासाठी भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते व पंचायत समिती, कुडाळ यांच्या पुढाकाराने २०१८ पासून कुडाळ येथे गावठी आठवडी बाजार सुरू करण्यात आला.
* जिल्ह्यातील दुग्धोत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न उत्पन्न वाढावे यासाठी मळगाव येथील कल्पवृक्ष शेतकरी गटाच्या पुढाकाराने दूध संकलनाचा पारदर्शक मॉडेल उभारण्यात आले.
* आंबडपाल येथे 65 टन मुरघास तयार करण्याचा यशस्वी उपक्रम करण्यात आला.
* पाणीटंचाईग्रस्त गाव टंचाईमुक्त करून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न आडेली येथील सोमेश्वर शेतकरी गटाच्या माध्यमातून करण्यात आला.
* याशिवाय श्री पद्धतीने भात लागवड, रानभाज्या ओळख,पारंपारिक बियाण्यांचे जतन, विविध शेतकरी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अशी विविध रचनात्मक कामे भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते विविध संस्था,प्रशासन यांच्या सोबत करत आहे.
संघर्षात्मक काम
* वन्य प्राण्यांच्या उपद्रवाच्या विरोधात 4 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर ५०० संख्येचा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचीच अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे हे लक्षात घेऊन वन्य प्राण्यांपासून शेती व शेतकरी यांचे संरक्षण करण्याचा अधिकार शेतकऱ्याला मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली.यामुळे शासन स्तरावर वन्य प्राणी उपद्रव विषयाची चर्चा होऊ लागली.
* भारतीय किसान संघाने केलेल्या पाठपुराव्यामुळे भात पिकाचे शासन दरबारी दुर्लक्षित असणारे विम्याचा लाभ 350 शेतकऱ्यांना मिळाला.
* इ पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शासकीय लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता, बहुवार्षिक पिकाचे दरवर्षी पाहणी अशा विविध अडचणी माननीय तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे लक्षात आणून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले.
अशाप्रकारे आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
भविष्यात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करण्याचा पवित्रा भारतीय किसान संघाने घेतला आहे.
भारतीय किसान संघाने केलेल्या मागण्या व त्याचे दृश्य परिणाम
1.शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च भागवण्या साठी रुपये 25000 शेतकऱ्याला देण्यात यावेत या देश स्तरावरील मागणी मुळे शेतकरी सन्माननिधी ही योजना शासनाने सुरू केली.
2.पर्जन्य मापन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक असावे ही मागणी आताच्या अधिवेशनात शासनाने मान्य केली. याचा उपयोग विमा वितरणामध्ये होणार आहे.
३ जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती नुसार आंबा, भात आणि इतर पिकांसाठी पीकविमा तसेच शेतकऱ्यांच्या हवामाना बाबत माहितीसाठी हवामान केंद्रांच्या उभारणीसाठी मागणी करण्यात आली व त्याचा पाठपुरावा करण्यात आला.
४. कोकणातल्या पिकांच्या गरजेनुसार शेती अवजारे यांचा विविध शासकीय योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
५ . रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती नुसार तसेच नारळ, सुपारी सारख्या उंच बागायती मधील शेती बागायतीस पाणी देण्यास सौर पंप अडचणीचे ठरत आहेत त्यामुळे कृषी वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी दिनांक २८/०२/२०२५ रोजी मा. मुख्यमंत्री कार्यालय सचिवालय मुंबई येथे माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मा.मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच मा. नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर ऊर्जा राज्यमंत्री,महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले.
वरील मागण्यांपैकी महाराष्ट्र शासनाने योजनेमध्ये यंत्र सामुग्री जसे की कार्बन फायबर हार्वेस्टिंग पोल,सुपारी सोलणी यंत्र या MHADBT योजनेत समाविष्ट केल्या आहेत. वन्यप्राणी शेती नुकसान विमा कक्षेत घेण्यात आले. तसेच हवामान केंद्र उभारणी प्रगतीपथावर आहे याबद्दल मा. मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासन यांचे खूप खूप धन्यवाद तसेच या कामी मदत करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे खूप खूप आभार.
भारतीय किसान संघ हा शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी कायमच आग्रही राहिला आहे. याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राणी,वीज जोडणी,सिंचन यामागण्यांसाठी आग्रही राहील वेळ पडल्यास मोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी संघर्ष धोरणांचा मार्ग अवलंबण्यासाठी सदैव तयार आहे
