कणकवलीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची गर्दी
कणकवली
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १६ असे एकूण ४३ अर्जांची विक्री करण्यात आली आहे. आज दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर अर्जांची विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा पातळीवर महायुती झालेली असली तरी महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने संपूर्ण कणकवली तालुक्यात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे.
या राजकीय हालचालींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून किती उमेदवार रिंगणात उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
