*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बालपणीची दोस्ती न्यारी*
बालपणीची दोस्ती न्यारी
नसते मनात कपट नीती
निखळ प्रेम असते वेगळे
कुंपणे त्यास कधी नव्हती…..1
मार्जर योनी प्रेमळ फार
लाडात असते बालकांचे
नाते त्यांचे *घट्ट* एवढे
नख पोटाला नाही लागायचे..2
असले जरी ते व्याघ्र कुळी
दोस्ती असते फार हळवी
मारत नाही कधी *पंजा*
म्हणून मांजर घरी पाळावी….3
मीनी मावशी असून वाघाची
भरून काढते कसर आईची
खेळतात बालके बिनधास
छाती *धडधडते* परस्थांची..4
असते माया *त्यांचे हृदयी*
उगा बाळगतो भिती आपण
असते नशीबी दु:ख ज्याच्या
सुचत नाही त्या शहाणपण…..5
पहातो आपण हल्ले श्वानाचे
असून लौकिक इमानदारीचा
नाही पाहीला *क्रूर* हमला
माणसावर चढवलेला माउचा..6
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
