You are currently viewing शनिवार, १७ जानेवारीला नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन

शनिवार, १७ जानेवारीला नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन

*शनिवार, १७ जानेवारीला नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन*

पिंपरी

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर, कणेसरजवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त या चौथ्या पुष्पाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते तसेच प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदानसोहळा व काव्यजागर संमेलन संपन्न होईल. ज्येष्ठ साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनात जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ अश्विनी गोरे (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान), संस्कारक्षम गृहिणी संजीवनी डोंगरे (मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे सन्मान), मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), शिक्षिका रोहिणी दौंडकर (पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षकप्रतिभा पुरस्कार), कवी संदीप वाघोले (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना प्रदान करून गौरविण्यात येणार असून संतोष गाढवे आणि आकाश भोरडे यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी राजेंद्र वाघ, मानसी चिटणीस, संगीता झिंजुरके, मधुकर गिलबिले, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, मीनाक्षी पाटोळे, नीलम जेजुरकर, प्रभाकर वाघाले, कुमार खोंद्रे आणि रजनी कानडे हे निमंत्रित कवी काव्यजागर करतील. नि:शुल्क असलेल्या या संमेलनाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन बाजीराव सातपुते यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा