You are currently viewing मणीहार

मणीहार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मणीहार*

 

रम्य पहाटे पहाटे

दव पानी उतरले

देवाजीने दिले जणू

मोती इवले इवले…..१

 

दवबिंदूंच्या मोत्यांनी

उजळली माळराने

किरणांनी सजविली

हिरवीगार अशी  पाने…..२

 

पानापानांवर साचले

नितळ उजळते क्षण

दवमोती सांगून गेले

जीवन अन् मरण….३

 

क्षणभंगुर हे मोती

त्यांचा गहिरा अर्थ

देवदत्त क्षण सारे

जाऊ देऊ नका व्यर्थ….४

 

इवल्याश्या मोत्यांचा

ओवला मी मणीहार

देवाजीच्या चरणी

वाहिला गं माझा भार….५

 

 

*©️®️ डॉ सौ. मानसी पाटील*

मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा