*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांनी माझ्या…हद्द ओलांडली..!!*
अंधार माझ्या मेंदूतला
शब्दांनीच दूर केला
वर्तमानात जगायला शिकवलं
पडदा..ओढून घेतला..
कल कलकलाट आजवर
शब्दांना कळला नाही
ईडापीडा कशीबशी टळली
गुणवत्ता..विझली नाही..
गुणरहित आयामरहित अमर्याद
शब्दांनी..हद्द…ओलांडली
गुलामी शब्दांची स्विकारून
स्वप्नांची..कक्षा ..रूंदावली
गर्दीतला..चेहरा माझा
सादरीकरणांनी शब्दांतून झाकला
निसटली निसरड्या वाटेची..हद्द
विश्वास..माझ्या शब्दांवर टाकला
क्लेश..कुरबूर..शब्दांची
तोंड वेंगाळले..माझ्यावर
वैर..सारे..विसरून
उभे केले… पायावर
बाबा ठाकूर
