भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर, शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे मैदानात
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक अजय गोंदावळे यांचे नाव निश्चित झाले असून त्यांनीही अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
