सावंतवाडीत वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी;
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांचा सकारात्मक प्रतिसाद
सावंतवाडी
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्याकडे केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची त्यांनी दखल घेत पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा व नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन योग्य नियोजन केले जाईल, असे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी संघटनेचे खजिनदार जयवंत टंगसाळी यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सुंदरवाडी रिक्षा चालक-मालक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा, तसेच सुनील तानावडे, राजन नवार, गुंडू सावंत, अण्णा कावले, संदेश राऊळ, पटेल, आदेश नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
