You are currently viewing मराठी युवा गझलकारांसाठी भव्य गझल स्पर्धेचे आयोजन गझल मंथन संस्थेचा नवीन वर्षातील नवा उपक्रम

मराठी युवा गझलकारांसाठी भव्य गझल स्पर्धेचे आयोजन गझल मंथन संस्थेचा नवीन वर्षातील नवा उपक्रम

मुंबई, (प्रतिनिधी) –

मराठी साहित्य क्षेत्रात नवोदित व युवा गझलकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गझलमंथन साहित्य संस्थेच्या वतीने भव्य मराठी युवा गझल स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातूनच अखिल भारतीय युवा गझल संमेलन आणि युवा गझलकारांचा गझलसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. नव्या वर्षात मराठी गझलेच्या चळवळीला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांमधील निवडक व उत्कृष्ट गझलांचा प्रातिनिधीक गझलसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. याचबरोबर आगामी अखिल भारतीय युवा गझल संमेलनासाठी स्पर्धकांचा प्राधान्याने विचार केला जाणार असून, त्याच संमेलनात पारितोषिक वितरण व गझलसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

अखिल भारतीय युवा गझल संमेलनात एका युवा गझलकाराला ‘गझलमंथन युवा गझलकार पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाची तारीख तसेच पुरस्कारार्थीचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.

या स्पर्धेसाठी गझल पाठविण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ असून, त्या दिवशी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेले मराठी युवा गझलकार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

पारितोषिके पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहेत : प्रथम – रु. २५०० व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय रु. १५०० व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय रु. १००० व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ (१) रु. ५०० व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ (२) रु. ५०० व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असणार आहे.

या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रायोजक म्हणून श्री. आबा पेडणेकर (रसिका थिएटर्स), प्रातिनिधीक गझलसंग्रहासाठी डॉ. कैलास गायकवाड, तर युवा गझलकार पुरस्कारासाठी श्री. महेश होनमाने यांनी प्रायोजन केले आहे. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शिवाजी काळे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी हे करणार आहेत.

स्पर्धकांनी आपली फक्त एकच गझल खालीलपैकी एका संकलकाकडेच व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी. संकलक सुधिर महाजन (9273777514), प्रणाली म्हात्रे (8779879446), अनंत देशपांडे (8379964550), महेश होनमाने (9923525533), स्नेहा शेवाळकर (8329064755), डॉ. मंदार खरे (9371026848), चेतन पवार (9604242334) यांच्याकडे गझल पाठवावी, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
___________________________
सही
प्रा.मानसी जोशी
९८१९७२५६५८
गझल मंथन साहित्य संस्था अध्यक्ष ठाणे जिल्हा.

प्रतिक्रिया व्यक्त करा