You are currently viewing तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

*तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र विभाग व IQAC व PM-USHA अंतर्गत तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून प्रा. बिना शेटे-कलंबटे, (माजी मानसशास्त्र विभाग प्रमुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) आणि प्रा. राजेंद्र शिंत्रे (मानसशास्त्र विभाग प्रमुख, श्री.पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी) उपस्थित होते. प्रा. बिना शेटे-कलंबटे यांनी व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तणावाचा आपल्या मानसिक आरोग्याबरोबर शारिरीक आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी तणाव नियंत्रित कसा करता येईल, त्यावरील उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली. प्रा. राजेंद्र शिंत्रे यांनी आत्महत्या होऊ नयेत याकरिता विद्यार्थ्यांनी व कोणत्याही व्यक्तीने व्यक्त होऊन आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर सल्लामसलत केली पाहिजे. तेव्हा त्यातून काही मार्ग निघतो. चुकीचे विचार व्यक्तीच्या डोक्यातून बाहेर काढणे आवश्यक असते. स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रशिक्षण घेऊन आपल्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करावी असे आवाहन केले. विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांनी आत्महत्या समाजात होऊ नये याकरिता समाजात जागृतीची गरज असल्याचे सांगितले.
आत्महत्याने एकाचा जीव जातो परंतु कुटुंबांचे आणि समाजाचे फार मोठे नुकसान होते. म्हणून आत्महत्या करणे हा पर्याय नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. नामदेव गवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच खारेपाटण कॉलेज व आयटीआय कॉलेज वैभववाडीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रमेश गुलदे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्रा. सत्यजित राजे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. निलेश कारेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा