You are currently viewing श्री देव वेतोबाच्या चरणी माजी मुख्य सचिवांचे सहकुटुंब दर्शन
Oplus_16908288

श्री देव वेतोबाच्या चरणी माजी मुख्य सचिवांचे सहकुटुंब दर्शन

देवस्थानच्या परंपरा व कारभाराबाबत समाधान व्यक्त

वेंगुर्ला / आरवली : महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थान येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थानची पुरातन परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. देवस्थानचा कारभार शिस्तबद्ध व समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी माजी मुख्य सचिवांचे स्वागत केले. शाल, श्रीफळ व वेतोबाचा प्रसाद देऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. देवस्थानाची स्थापना, नवस-परंपरा, पादुका, तसेच केळ्याचा घड अर्पण करण्यामागील धार्मिक संदर्भ यांची सविस्तर माहिती अध्यक्ष जयवंत राय यांनी दिली.

श्री देव वेतोबाची आख्यायिका व देवस्थानच्या जागृत परंपरा ऐकून मनुकुमार श्रीवास्तव व त्यांचे कुटुंबीय भावविवश झाले. देवस्थानास पुन्हा आवर्जून भेट देण्याचे वचन देत त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा