You are currently viewing कर्म हीच पूजा:- डॉ. न.म.जोशी पुणे
Oplus_16908288

कर्म हीच पूजा:- डॉ. न.म.जोशी पुणे

*डॉ. न. म. जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान*

पुणे :

कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते जे काम मिळेल ते मनापासून करा. कर्म हीच पूजा माना तर आयुष्याचे जीवन गाणे होईल. काम हाच आपला राम आहे असा यशस्वी जीवनाचा मंत्र डॉक्टर न.म.जोशी यांनी दिला.

शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदाना प्रित्यर्थ आणि वयाच्या ९१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आदेश जैन फाउंडेशन पुरस्कृत, ‘साहित्य सेतू’ व ‘ज्ञानसेतू’ विभागांतर्गत आयोजित केलेल्या “जीवन गौरव प्रदान सोहळ्यात” सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मूर्ति शास्त्र ती शास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. ब.देगलूरकर हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते मानपत्र सन्मान चिन्ह शाल व अक्षरधन देऊन डॉ. न म.जोशी सरांना सन्मानित करण्यात आले.

डाॅ. न. म .जोशी यांचा आप्तेष्ट व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सभागृहातील सर्व रसिकांनी उभे राहून आदरयुक्त मानवंदना देताच,कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते डाॅ. न. म. जोशी सरांना, जीवनगौरव पुरस्कार २०२६ सहर्ष प्रदान करण्यात आला.

“आदिश जैन फाउंडेशनने दिलेला हा जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी पद्म पुरस्कारां इतकाच महत्वाचा आहे. त्याचा मी सहर्ष स्विकार करतो” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करीत सन्मान सोहळ्याचा स्विकार केला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देगलूरकर म्हणाले,”डॉ. न. म. जोशी सरांप्रमाणेच मी ही सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील डाॅ.पु. ग. सहस्त्रबुद्धे सरांचा विद्यार्थी होतो. त्यांनी आम्हाला जीवनदृष्टी दिली. न. म. जोशी सर हे प्रसिद्ध साहित्यिक ख्यातनाम लेखक आहेत. तरीही त्यांच्यातील शिक्षक अजूनही शिकवण्याचे काम करतो. त्यांना मुलं फार प्रिय आहेत मुलांना गोष्टी सांगण्यात न. म.रमतात. त्यांच्या प्रत्येक भाषणात एखादी बोधक रंजक पर गोष्ट असतेच. साहित्य क्षेत्रात डाॅ. न.म. जोशी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटवली आहे”. आदिश जैन फाउंडेशनच्या अध्यक्षा, ‘सौ. मृणाल जै’न व विश्वस्त ‘हेमंत जैन’ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक माननीय राजन लाखे, (अध्यक्ष पिंपरी चिंचवड म. सा. प. शाखा) वि. ग. सातपुते, (प्रसिद्ध साहित्यिक, भावकवी) , प्रा .सु .द.वैद्य..(व्यासंगी लेखक, विचारवंत,कवी) आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा जीवन गौरव सोहळा संपन्न झाला.

प्रा. सुर्यकांत वैद्य सरांनी डॉ. न. म. जोशी सरांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या.

त्यांच्या जीवन प्रवासातील मैत्री पुर्ण आठवणींचा वेचक, वेधक आढावा घेत डॉ. न. म. सरांचे व्यक्तीमत्व रसिकाभिमुख केले.

मा. राजन लाखे सरांनी अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था मधील डाॅ. न म जोशी सरांचे योगदान तसेच साहित्य क्षेत्रातील कार्य कर्तुत्व याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले.

मा. वि.ग. सातपुते साहित्यिक भावकवी यांनी डॉ .न.म. जोशी यांचा मला लाभलेला सहवास म्हणजे दैवयोग योग आहे असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. व त्यांच्या साहित्यिक योगदानाची आणि त्यांनी महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या कार्यास कसे मार्गदर्शन केले याच महती विषद केली.

मनिषा सराफ यांच्या “जय शारदे वागीश्वरी” या सुरेल ईशस्तवनाने कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात झाली. कवयित्री ऋचा कर्वे यांनी व्यासपीठ मान्यवरांच्या ओघवत्या शैलीत परीचय करून दिला.

सर्व मान्यवरांना, सन्मानचिन्ह, शाल व अक्षरधन देऊन गौरविण्यात आले.

रसिकांना खेळवून ठेवणारे, ज्ञानसेतूचे कार्याध्यक्ष, कविराज विजय यशवंत सातपुते यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या व ज्ञानसेतूच्या अध्यक्षा सौ. मृणाल जैन यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी आदेश जैन फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराची संकल्पना स्पष्ट केली त्यात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगितला तसेच आदिश जैन फाउंडेशन ची पुढील वाटचाल, प्रमुख उद्धिष्टे, तसेच संस्थेच्या आगामी वाटचालीची दिशा निर्देशित केली.

पारंपारिक पद्धतीने प्रतिकात्मक अभिष्टचिंतन सोहळा यावेळी संपन्न झाला.

शाहू मृणाल जैन सौ पुष्पा कुलकर्णी सौ मनीषा सराफ प्रिया दामले आदी, पाच सुवासिनींच्या हस्ते डॉक्टर नमजोशी यांना औक्षण करण्यात आले. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.

साहित्य सेतूच्या कार्याध्यक्ष..सौ. राजश्री सोले यांनी मानपत्र वाचन केले. सदर मानपत्राचे लेखन साहित्य सेतूचे अध्यक्ष डाॅ दिलीप गरूड, तर शब्दांकन ज्ञानसेतूचे कार्याध्यक्ष विजय सातपुते, व संस्थेच्या अध्यक्षा सौ. मृणाल जैन यांनी केले.

केशव जैन, साची जैन, सल्लागार म. भा. चव्हाण, श्रीपाल ललवाणी, यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा