You are currently viewing धर्म म्हणजे काय?

धर्म म्हणजे काय?

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री वाणी वेणुमाधव केरकलमट्टी लिखित अप्रतिम लेख*

 

*धर्म म्हणजे काय?*

 

सर्वसाधारण पणे धर्म म्हणजे एकच निश्चित उत्तर नसावं, धर्माचा अर्थ संस्कृती नुसार बदलत जातो असं मला तरी वाटते.

खरा तोच धर्म आहे माणूस म्हणून माणसासारखं वागणं आणि मानवतेचा धर्म पालन करणं. पूर्वीच्या काळी शास्त्रानुसार काही सांगितले होते त्यात सुद्धा काही तथ्य होते. साधारण पणे धृ म्हणजे धारण किंवा आचरण करणे त्यात कर्तव्य असू शकेल किंवा समाजाप्रती असलेली काही तळमळ सुद्धा असू शकेल.

निसर्गा प्रति असलेली भक्ती, तो सुद्धा एक राष्ट धर्म होऊ शकतो नाही का?

निसर्गातील झाडे, मूळे, पाने हीं राष्ट संपत्ती आहे ती जतन करणे हा सुद्धा धर्म होऊ शकतो.

धर्म म्हणजे योग्य धर्म म्हणजे सत्य,धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे शुद्ध अंतःकरण. धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे मानवतावाद…

धर्म म्हणजे फक्त पूजा पाठ करण्यात नाही,किंवा ग्रंथ नव्हे, तर धर्म म्हणजे जीवन जपण्याची एक उत्कृष्ट पद्धती..

मातृ प्रेम, पितृ प्रेम, राष्ट प्रेम, संस्कृती प्रेम हे सुद्धा धर्म मध्येच मोडतात..

खरा धर्म म्हणजे निसर्ग संवर्धन, निसर्ग आपली संस्कृती, तिचे संवर्धन म्हणजे देवाची पूजा.

मग सध्या आपण काय करत आहोत?झाडांची कत्तल करून आपण स्वार्थ साधून पर्यावरण दूषित करत आहोत.नदी प्रदूषण, करून त्याचं नदीची पूजा कार्य करतो हा कोणता धर्म बरं?कारण सृष्टीशिवाय माणूस नाही.निसर्गाशी सुसंवाद साधणे हा सुद्धा निसर्ग धर्म आहे ना, आपण धर्म मानतो, पण आचरण करतो कमी.स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून प्रामाणिक पणे राहण्यात खरा धर्म नाही का?

Charitiy begins at the home या धर्तीवर घरातून पहिला संस्कार मिळतो तर त्याच संस्कारातून वावर असला तर खरंच खुप मोठा फरक पडेल. ज्याप्रमाणे शामच्या आईने शामला जे संस्कार दिले त्यातून शाम घडला ना?

मानवतेचा गाभा म्हणजेच दया, शांती आणि करुणा.कृष्णाने अर्जुनास हेच सांगितले कि,युद्ध कर पण असक्तिशिवाय,जिंकण्याचा गर्व नको,आणि मारण्याचा आनंद नको, आणि हरण्याचे दुःख नको फक्त न्यायासाठी उभा रहा.

जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांतता, संयम, अहिंसा आणि समानता आपापसातील द्वेष भाव, कट्टरता न बाळगता समोपचाराने सुद्धा सांधता येतात.जेणेकरून आंतरराष्ट्रीय संबद्ध नक्कीच सुधारणा होऊन एकोपा निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल असे मला तरी वाटते.

यातूनच हेचं सिद्ध होते कि,मानवता हाच खरा धर्म आहे….

 

वाणी वेणूमाधव केरकलमट्टी…अमेरिका..

प्रतिक्रिया व्यक्त करा