You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सावंतवाडी नगरपालिकेला शैक्षणिक भेट
Oplus_16908288

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सावंतवाडी नगरपालिकेला शैक्षणिक भेट

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेला भेट दिली. या विशेष ‘फिल्ड व्हिजिट’ दरम्यान नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

या भेटीत विद्यार्थ्यांना कर संकलन, जमा झालेल्या निधीचा लोकोपयोगी कामांसाठी होणारा वापर, शहराची पाणीपुरवठा यंत्रणा तसेच कचरा व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच आगामी प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व नगराध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. सावंतवाडी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी कर्तव्यदक्ष राहावे, असे आवाहनही यावेळी नगरपालिकेतर्फे करण्यात आले.

आपल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणी साहेब शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले तसेच मंडळाच्या सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

या उपक्रमात मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, शिक्षक तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा