*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि.देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नदीकाठचे गाव*
*************************
नदीकाठचे हे गाव नाही त्याला वाव
नदीच्या तळाशी काळाचे खोल घाव
कधी काळी गाव भरले गोकुळ होते
खिन्न मनाने नदी उध्वस्त गाव पहाते
छोटे गाव आधीचे लोभस छान होते
लोक गरीब ते, मनाने धनवन्त होते
गुण्यागोविंदाने नांदे इथले लोक ते
नदीला याचे फार कौतुक वाटत होते
नदीकाठी येती गावच्या बायकापोरी
कोंडली मनं नदीपाशी मोकळी करी
निसर्ग बदले काळीज ठोका चुकला
पाऊसमान अंदाज दरसाल चुकला
विचार बदलले,मनभेद त्यात झाले
मतभेद वाढता लोक दूर होत गेले
पाहुनी हे, नदीचे पात्र आक्रसले होते
कधी आठवे पात्र दुथडी वहात होते
*******************************
कवी अरुण वि.देशपांडे-पुणे
९८५०१७७३४२
