You are currently viewing नियती रडते आहे

नियती रडते आहे

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

“वनहरिणी वृत्त”

*नियती रडते आहे*

 

घरसंसारी हेवेदावे पाहुन मन तळमळते आहे

नाते जपणे असते जरुरी कळूनी ना समजते आहे

 

पिझ्झा बर्गर आवड बनली, भाजी भाकर विसरुन गेले

जटिल समस्या लेकुरवाळे, व्याकुळ मन मग छळते आहे

 

शेतीभाती विकुन मोकळे, गाडीघोडे धूम उधळले

अधांतरी हे भविष्य झाले, कुठे कुणाला कळते आहे

 

झाडे तोडुन रस्ते बनले, इमारतींचे जाळे विणले

ऱ्हास निसर्गाचा होताना, संकट पुढचे दिसते आहे

 

चालत फिरणे शिक्षा वाटे, प्रत्येकाला मोटार हवी

प्रदूषणाने रोग पसरले, सजीव सृष्टी मरते आहे

 

खत फवारणी जालिम औषध, उत्पन्नाने कळस गाठला

लोभापायी जीवन अपुले मातीमोलच ठरते आहे

 

नदी नि नाले गटार झाले, सांडपाण्यात मस्त नाहले

क्षणास अंतिम गंगाजल ते, मरणही सहज करते आहे

 

दुधात भेसळ, औषध भेसळ, भाजीपाला फळात भेसळ

सांग मनुष्या, कोण फसवतो..? काय खायचे उरते आहे

 

चूक कुणाची ? कोण भोगतो ? प्रश्न चुकीचा म्हणते आहे

मनुष्यप्राण्याच्या कर्मांनी नियती सुद्धा रडते आहे

 

🖊️ दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा