You are currently viewing पेटलेला दिपक

पेटलेला दिपक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*

 

*’पेटलेला दिपक’*

*(एक संवेदनशील कथा)*

 

आबासाहेब देशमुख म्हणजे तालुक्याच्या राजकारणातला एक अखंड अध्याय होता.आबासाहेब देशमुख हे नाव उच्चारताच पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेतल्या कार्यालयापर्यंत लोक मान खाली घालत असे.पांढरी टोपी,पांढरा कुर्ता, मिशांवरचा रुबाब आणि बोलण्यात ठामपणा चाळीस वर्षांचा राजकीय अनुभव आबांच्या पाठिशी होता.आबा तीन पंचवार्षिक झेड.पी.अध्यक्ष,होते जनतेला दिलेल्या आश्वासनांप्रमाणे आबांनी कामं केलीत म्हणून ते “विकासरत्न” या नावाने ओळखले जायचे.कारण शेतकऱ्यांपासून तर सामान्य लोकांपर्यंतच्या असंख्य अडचणी आबानी सोडवल्यात जे सांगीतलं ते करून दाखवलं कोणी केला नसेल असा विकास आबांनी करून दाखवला म्हणून आबांचा गल्ली ते दिल्ली असा राजकीय दबदबा होता.शिवाय तालुक्यातील सधन शेतकऱ्यांपैकी एक देशमुख घराण्याच नाव होतं सत्ता,संपत्ती, प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्व आबांच्या घरात नादंत होतं घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा कायम राबता असायचा.दिवसभर वर्दळ असायची. कुणी शेतजमिनीचा वाद घेऊन येई, कुणी मुलाच्या नोकरीसाठी शिफारस मागे,तर कुणी निवडणुकीत मदतीसाठी पण आबासाहेब कधी कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नसत.पत्नी सुनीताताईसुध्दा आबांच्या बरोबरीने राजकारणात सक्रिय होत्या त्या पंचायत समिती सदस्य.पण शांत,संयमी,व घरातल्या वादळांना आतून झेलणारी बाई. आबांचा मोठा मुलगा पंकज हा देखील ग्रामपंचायतीचा सरपंच होता वडिलांच्या सावलीत वाढलेला, राजकारणात स्थिरावलेला.तर दुसरा मुलगा राहुल बांधकाम विभागात डेप्युटी इंजिनिअर,नोकरी,शिस्त आणि प्रतिष्ठा यांत रमलेला.तर तिसरा मुलगा दिपू अर्थात दिपक देशमुख.घरातल्या सगळ्यांत वेगळा दिपू तसा अतिशय हुशार दहावी, बारावी बोर्डात पहिला.एम.एस्सी.ला विद्यापीठात टॉप शिवाय असं एकही क्षेत्र नसेल की तिथे दिपकने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली नसेल.खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम,गाणे,अभ्यास शिवाय समाजकार्य,गरजवंताना मदत करणे अर्थात जिथे नाही तिथे प्रत्येक ठिकाणी तो पुढेच.त्यामुळे दिपक सर्व शिक्षकवृंद व विशेषतः प्रविण महाजन सरांचा लाडका विद्यार्थी होता.“हा मुलगा फार पुढं जाणार,”असं प्रविणसर अभिमानानं सांगायचे. दिपक म्हणजे दिसायला देखणं व्यक्तिमत्त्व,बोलण्यात आत्मविश्वास गावातल्या मुलींना तो आपसूकच आवडायचा.पल्लवी तर मामाची मुलगी असल्याने दोघंही लहान पणापासून सोबत राहीले एकाच कॉलेजमध्ये शिकलेत तेव्हा पल्लवी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. त्यामुळे दोघांचं नातं हळूहळू घट्ट होत गेलं.पण दिपक जेव्हढा देखणा हुशार होता तितकाच तो सणकी,तापट आणि रागीष्ट होता अन्याय त्याला सहण होत नव्हता कोणी काही बोललं की तो थेट हातापायीवर यायचा.तसा तो समजूतदारही होता कोणी अडचणीत असला की तिथे दिपक शिवाय पर्याय नसायचा.दिपक ने एक आवाज दिला की सारे त्याच्या अवतीभवती गोळा व्हायचे अडल्या नडल्या गरजवंताला मदत करायचा‌, पण छोट्याशा कारणावरून त्यांचं रक्त उकळायचं आबांपासूनतर घरातले सर्व वारंवार समजवायचे.पण तो वरवर हो आता नाही करणार असं म्हणायचा आणि काही दिवसांत पुन्हा जैसे थे.जर काही कार्यक्रमा निमित्ताने सुनीताताई इथेतिथे जात असल्या तर दिपकच्या चुकीच्या वागण्याचा विषय निघायचा त्यामुळे सुनीताताई मनोमनी नाराज व्हायच्या,चारचौघात दिपक बद्दलच एकाव लागत असे गावात दिपकच्या गुंडगिरी बद्दल हळूहळू कुजबुज व्हायची एकदा राहूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहूलला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून “त्या दिपकला जरा आवरा त्याच वागण बरोबर नाही कुठेही हाणामारी करतोय तो,दिपक तुमचा भाऊ आहे ना”! असं सांगितल्यावर राहूल आबांना सांगायचा.गावातली काही मंडळी घाबरत घाबरत का असेना पण पंकदभाऊला दिपक बद्दलच सांगायचे पंकज सरपंच असल्यामुळे त्याला नाईलाजाने ऐकून घ्यावं लागे.मी त्याला समजवतो अशी मनधरणी करून समोरच्याची समजूत काढायचे.

आबांची सुन पूनमलाही दिपक बद्दल बरवाईट ऐकून घ्यावं लागे यामुळे देशमुख घराण्याच राजकारण कितीही चांगलं असलं तरी या दिपकमुळे त्यांना मनस्ताप सहन करा लागे. दिपकच्या चुकीच्या वागण्यामुळे घरातली गावातली सर्व मंडळी दिपकच्या विरोधात होते.शिवाय घरच्यांच्या मनातही दिपक बद्दल राग होता. घरात त्याला कोणी आपलं समजत नव्हते.“ काहीजण तर आपल्या पोरांना दिपक पासून दूर ठेवा असं सांगायचे.दिपकला खूपवेळा समजावून ही तो समजण्यापलीकडे होता भलेही तो‌ हुशार असेल गरजवंताच्या मदतीला धावून जात असे पण संताप,रागावर तो नियंत्रण ठेवायचा नाही.शेवटी काय एखाद्याचं राजकारण संपवायला छोटंसं कारण पुरेसं असतं आणि तसंच झालं.बाजार समितीच्या निवडणुकीत आबासाहेबाच्या पॅनलने आबांचा विरोधक समीर पाटीलचा दारुण पराभवा केला समीर पाटील निवडणूक हरला,आणि काही दिवसांनी विद्यापीठात जी.एस.ची निवडणूक दिपकने,किरणला हरवून जिंकली.एकाच महिन्यात बाप बेट्यांचा पराभव किरणच्या जिव्हारी लागली त्यांच्या मनात अपमानाचा राग साठत गेला. गावातली मंडळी एकार्थी वेगळ्या हेतूने समीर पाटील व किरणं बद्दल बोलू लागले.आता मनात आग पेटली म्हटल्यावर अपमानाचा बदला घेतल्याशिवाय ती काय शांत होते का? खरतर दिपकची काहीही चुक नसताना जे झालं ते निवळल होत तरी पराभव झाल्याचा राग किरणला बोचत होता म्हणून किरणने स्वत:हून दिपकला डिवचले आबासाहेब बद्दल बरंवाईट बोलू लागला देशमुख घराण्याच्या चारित्र्यावर शिंतोडो फेकू लागला दिपक बद्दल ठिक होती पण दिपकच्या घरच्यांवर किरणने आगपाखड केल्यामुळे दिपक खवळला पेटून उठला आणि

भरचौकात दिपक व किरणं यांच्यात तुफान हाणामारी झाली.साऱ्या गावात वाऱ्यासारखी खबर पसरली सर्व गावकरी गोळा झाले,बघ्यांची गर्दी वाढली,अनेकांनी आवरण्याचा प्रयत्न केला पण कोणीच माघार घेत नव्हते पोलिस यंत्रणा वेळेवर आली नसती तर फार मोठा अनर्थ झाला असता. शिवाय आबांचा राजकीय दबदबा व एक चांगली प्रतिष्ठा लक्षात घेता दिपकच्या विरूद्ध पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली नाही.पण त्याच काळात आबासाहेबांना आमदारकीचं तिकीट मिळणार होतं.पण या दिपकच्या भानगडी मुळे तिकीट मिळाले नाही तिकीट कापलं गेलं. आबांनी विरीष्ठ नेत्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला माफी मागितली पण सारेकाही असफल झाले.कारण विरोधकांना बंड करायला आयता विषय मिळाला त्यांनी मोर्चा काढले आंदोलन केले, गावबंद केले,पेपरबाजी झाली दिपकच प्रकरण विरोधकांनी उचलून धरले दिपकने केलेल्या कृत्याची बातमी वरपर्यंत पोहचली त्यामुळे पक्षश्रेष्ठींचाही नाईलाज झाला आबांच तिकीट कापले गेल्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांना आनंद झाला.‌ दिपकच्या एका चुकीमुळे आबांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वर्चस्वाला गालबोट लागलं.पंकजही सरपंचाची निवडणूक हरला.घराचं नाव बदनाम झालं.त्या रात्री देशमुख वाड्यात वादळ उठलं.“आजपासून हा मुलगा माझा नाही!”संतापाच्या भरात आबासाहेब गरजले.सुनीताबाई रडत होत्या.पंकज राहूलच्या संतापाची‌ आग भडकली होती गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती.वातावरण गंभीर झाल्यामुळे दिपक घरी जाऊ शकत नव्हता त्याला पश्चात्ताप तर झालाच पण आलीया भोगाशी असंच म्हणावे लागेल.

*चाळीस* वर्षांच्या राजकीय कारकीर्दीला गालबोट लागल्यामुळे आबांचा संतापाचा उद्रेक झाला कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागला,गावात तोंड दाखवायला जागा राहीली नाही. आबांची प्रतिष्ठा,राजकीय वर्चस्व व अडल्या नडल्या गरजवंताच्या पाठीशी आबा उभे राहतअसल्यामुळे गावकऱ्यांनी फारसं मनावर घेतले नाही पण विरोधीपक्षनेत्या़मुळे आबांची जास्तच मानहानी झाली.त्यांच्यातर पथ्यावर पडले.आबांना आमदारकीच तिकीट न मिळाल्यामुळे विरोधकांना आनंद झाला पण आबांना जो काही अपमान सहन करावा लागत होता तो खूप वेदनादायक होता म्हणून दिपकला त्यांनी घरातून,संपत्तीतूनच नाहीतर वंशावळीतूनच काढायचं ठरवले ज्या दिवशी दिपकने हाणामारी केली त्याच दिवशी तो आबांसाठी कुटुंबासाठी मेला होता म्हणून आबांनी दिपकची दशक्रिया विधी करायचं ठरवलं. दिपकची जिवंतपणी दशक्रिया विधीला घरच्यांनी नकार दिला संतापाच्याभरात उगाच काहीबाही निर्णय घेऊ नका म्हणून पंकज राहून सुनिताताईंनी खूप खूप समजावण्याचा प्रयत्न केला गावातील नात्यागोत्यातील काही वडिल जेष्ठ मंडळीनेही आबांना समजावलं.”झाली चुक पोराकडून पण जिवंत असताना त्याची दशक्रिया विधी करणे योग्य नाही”,असं जिवतोडून सांगूनही आंबा समजून घेण्यापलीकडे होते त्यामुळे आबंपुढे कोणाचे काही चालले नाही इथूनपुढे या घरात दिपकच नावही कोणी काढायचं नाही त्याची एकही आठवण या घरात नको,तो आपल्यासाठी मेला म्हणजे मेला बसं विषय बंद अशी धमकी दिल्यावर कोणबर आबांच्या विरोधात जाईल. शेवटी दिपकच्या दशक्रियेच्या दिवशी देशमुख वाड्यात माणसांचा प्रचंड जमाव जमला होता.दिपक जिवंत होता…तरीही त्याचं सगळं संपवण्यात आलं होतं.आबासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन विधी पार पाडली. पिंडदान,मंत्रोच्चार,ब्राह्मणांना दान सगळं अगदी विधिवत जणू दिपक खरंच या जगातून निघून गेला अशीच पुजाविधी केली.दिपकचा मित्र रविने आश्रय दिल्यामुळे भाडंण झाल्यापासूनदिपक स्वतःच्या घरी गेला नव्हता.जेव्हा आबांनी त्याची दशक्रिया विधी केल्याचं कळलं त्यावेळी दिपकने टाहो फोडला खूप रडला तो आंतून तुटून गेलं होता त्या

क्षणी दिपकला जाणवलं की एका चुकीमुळे आपण केवळ घरातून नाही,तर नात्यांतूनही हद्दपार झालो आहोत.हे असं का झालं आपल्या हातून.सुनीताबाई हुंदके देत रडत होत्या आई म्हणून त्यांच काळीज तुटत होतं,पण आबासाहेबांच्या निर्णयासमोर त्या गप्प होत्या.पंकज आणि राहुल मान खाली घालून उभे होते काहीन बोलण्याचाच मार्ग त्यांनी निवडला होता.आणि पल्लवी…ती दूर उभी राहून पहात होती,पुनम वहिनीची तर हिम्मतच होत नव्हती काहीबाही बोलण्याची.त्या दिवशी सारं गाव हळहळले प्रत्येकजण रडत होते पण नाईलाज होता.दिपक पुरता बदनाम झाला तरी त्याची दया येत होती तर दुसरीकडे आबांनी दाखवलेल्या धाडसाची गावभर चर्चा रंगत होती.दिपकला त्याच्या घरचे दार कायमचे बंद झाले आता काय करावं काही सुचेना सरतेशेवटी दिपक थेट प्रविण महाजन सरांच्या घरी गेला सरांच्या पायावर डोकं ठेवून अक्षरशः रडू लागला “सर… माझं चुकलं…हो मला माफ करा…मी असं करायला नको होत.माझ्या घरच्यांनी मला नाकारलं सर मी काय करू”…. महाजन सर शांत उभे होते.बराच वेळ काहीच बोलले नाहीत.मग हळूच म्हणाले “दिपक तुझ्या हुशारीचा मला अभिमान होता रे पण तुझ्या वागण्यानं तुझ्या घराचं नाव मातीत गेलं.आज तुझ्यामुळे मला सुद्धा मान खाली घालावी लागली.” उगाच गावातल्या लोकांचा रोष नको म्हणून महाजन संरांनही दिपकला घराबाहेर काढले.त्या घरातही त्याच्यासाठी जागा उरली नव्हती.एक शेवटचा आधार म्हणून दिपकने पल्लवीला फोन केला पण तिनेही दिपकचा तिरस्कार केला.ती रडत होती,पण शब्द कठोर होते.“दिपक आपल्या नात्याला आता अर्थ उरलेला नाही.माझे घरचे मला बोलायला लागलेत तेव्हा तुझं माझं नातं संपलं.” काय आहे तुझं भविष्य एक स्वप्न घेऊन मी तुझ्या सोबत होते.पण तू कर्तव्य शुन्य निघाला ज्याचं काहीच भविष्य नाही त्याच्या सोबत मी कशी राहू.तुझे आता करायचेच नाही तर , रहायचे सुध्दा वांदे झालेत तेव्हा माझ्या पोटाला भाकर कशी मिळेल.प्रेमाणे पोट भरतं नाही दिपक त्यासाठी हातांना काम हवं,गुंडगिरी आणि कर्तृत्व नसलेल्या माणसा सोबत मी नाही नातं जोडू शकत दिपक तू मला विसर.दिपक काही बोलण्याधीचं फोन कट झाला‌.एक शेवटचा आधार होता तो ही तुटला गावात त्याच्याबद्दल एकच चर्चा होती देशमुखांचा मुलगा वाया गेला.रवि सतिश महेश यांच्याशिवाय दिपक सोबत कोणी नव्हते तो गाव सोडून जायला लागला कुठे जाशील‌ म्हणून महेशने विचारल्यावर आता दशक्रिया विधी झाली आहे तेव्हा…… जगून तरी कायकरणा….रवि रागवला. नाही दिप्या तू भलतासलता विचार करू नकोस तुला जगायचं आहे लढायच आहे हिच संधी आहे तुला काहीतरी करून दाखवायची कॉलेजला महाजन सर नेहमीच तुझं उदाहरण द्यायचे की एक दिवस हा दिपक फार मोठा होईल नाव कमवेल.तेव्हा आता ती वेळ आली आहे.अरे आयुष्याच्या लढाईत हारून मरण्यापेक्षा काहीतरी करून दुश्मनांच्या तोंडावर काळ फास दिप्या.अरे लढ….लढून जिंक”.

दिपकच्या तिघही मित्रानी त्याच्यात दडलेल्या आत्मविश्वासाची ज्योत पेटवली.दिपकने मान्य केले पण त्याबदल्यात मित्रांकडून एक वचन घेतले.मी असाही मेलोच आहे तेव्हा मी कुठे आहे काय करतोय याची खबरबात कोणालाही लागता कामा नये माझ्या घरच्यांना तर जाऊच दे पण गावात कोणालाही म्हणजे कोणालाही कळायला नको.कोणी किती विचारले तरी सांगायचं नाही. सर्वांनी होकार दिल्यावर दिपक पुन्हा एकदा महाजन सरांकडे गेला.यावेळी त्याच्या हातात एक साधा रूमाल होता त्या रूमालाला घट्ट गाठ मारून सरांच्या हातात दिला “सर!इथून पुढे माझं काय होईल मलाच माहीत नाही.समोर अंधार आहे उमेदीची वाट सापडनं मुश्किल झाले.मी आता जगलो काय मेलो काय कुणाला काय फरक पडणार आहे.मी गाव सोडून जातोय,कुठे जायचं ते निश्चित नाही कदाचीतच मी परत येईन,कारणं मी आता एकटा झालोय.दुसऱ्याची चुक असतांनाही त्याची शिक्षा मला मिळाली‌ मी सारकाही हरवून बसलो सर कोणीच माझ‌ राहील नाही.मी मोठा होईल की नाही माहीत नाही, तरी काहीतरी होवून दाखवण्याच्या खोट्या अपेक्षेने मी हे गाव सोडतोय तुर्तास हा रूमाल तुमच्याकडे ठेवा मी जर जगलो तर ज्या दिवशी मी काहीतरी होऊन परत येईन,त्या दिवशी या रूमालाची गाठ तुमच्या हाताने सोडेन”.महाजन सर काहीच बोलले नाहीत.दिपकने सरांच्या पायावर डोकं टेकवून घराबाहेर पडला.दिपकला जाताना पाहून पहिल्यांदा सरांच्या डोळ्यांत अश्रू दिसले.वर्ष असेच सरून गेले पण वर्षभरात दिपक बद्दल कोणी काही बोललं नाही.साधी विचारपूस ही केली नाही.राहूल पंकजदादा कितीदा रवि महेश सतिशला दिसायचे पण एक शब्दही दिपक बद्दल त्यांच्या तोंडून निघाला नाही आबांच जाऊ द्या पण आईनेही कधी दिपकची विचारणा केली नाही की दिपक कुठे आहे,कसा आहे,पंकजदादांच सरपंच पद गेल्यामुळे पुनम वहिनी तर दिपकचा तिरस्कारच करायच्या.सर्वांनाच दिपकचा विसर पडला होता. जिच्यासोबत दिपकने लग्नाचे स्वप्न पाहिले होते त्या पल्लवीनेही दुसऱ्यासोबत लग्न करून घेतले तसेच विरोधी पक्षनेत्यांना वाटलं की आता देशमुखा़ंच राजकारण संपल पण झालं उलटंच त्यांचा भ्रमनिरास झाला त्यांनी केलेल्या विरोधाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली.कारण आबांनी केलेली कामं त्यांनी केलेला विकास हे लोकांच्या लक्षात होतं शिवाय दिपकची दशक्रिया विधी केल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली त्या अनुषंगाने आंबा देशमुखाचं गेलेलं राजकीय वैभव परत मिळालं पुन्हा त्यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.आणि पुर्व पदावर येवून विरोधकांना तोंडघशी पाडले.आबांनी पुन्हा राजकीय विजय मिळवला पण त्या आनंदात दिपक कुठेच उजळून दिसत नव्हतं.रवि सतिश महेश यांना दिपकच्या घरच्यांचा राग येत होता माणसाने एव्हढीही कठोर होवू नये. मित्र पक्के पण सख्खे होते म्हणून रविने पुण्यात त्यांच्य एका मित्राच्या रूमवर दिपकची निटनेटकी व्यवस्था केली होती त्यामुळे दिपक निश्चिंत होता.फक्त मित्रच दिपकच्या सतत संपर्कात होते म्हणून कधी एकटं वाटलं नाही.पुणे मोठं शहर अनोळखी चेहरे, तेव्हा एका छोट्याशा खोलीत दिपकचे नवीन आयुष्य सुरू झालं पहिले काही महिने दिपक साठी भयानक होते.मित्रांकडून पैशांची मदत,एकटेपण,मन अस्वस्थ,रात्री अभ्यास करताना त्याला गाव आठवायचं आई भाऊ आठवायचे आबांचा दरारा,पल्लवीचं हसणं सारकाही डोळ्यासमोर दिसायचं कधी वाटायचं सगळं सोडून परत गावाकडे जावं पण लगेच दशक्रिया आठवायची तेव्हा तो स्वतःशीच म्हणायचा,नाही‌ मी मेलो आहे.आता मला गमावण्यासारखं काहीच नाही.” गाव सोडताना दिपकने ठरवलं होतं की आता फक्त एम.पी.एस.सी.द्यायची आणि काही तरी होवूनच गावात परतायचं बसं….हि परिक्षा दिपक साठी परीक्षा नव्हती.तो त्याचा पुनर्जन्माचा मार्ग होता.दिवसाचे सोळा-सोळा तास अभ्यास.कुठेही येणं जाणं नाही,की फिरणं नाही कोणाशी बोलणं नाही. खाण्यापिण्याची पर्वा न करता फक्त एक ध्येय,एक लक्ष ठेवून दिपकने त्यांच्या अंतःकरणातली ज्ञान ज्योत पेटवली होती.धिर देण्यासाठी रवि, सतीश,महेश अधूनमधून फोन करायचे.“आम्ही आहोत”एवढंच म्हणायचे.साडे तीन वर्षं…दिपक पूर्णपणे गायब होता.गावात कुणी त्याचं नावही घेत नव्हतं. कुणालाही त्याची आठवण येत नव्हती पण ज्याचं कोणी नसतो त्याचा परमेश्वर असतो समय बडा बलवान होता है भाई,तो बरोबर हात देऊन मदत करत असतो बुडणाऱ्याला देव साथ देऊन वाचवत असतो मेहनत परिश्रम कोणाचेच वाया जात नाही जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवत असाल तर….आणि अगदी झालंच तसं साडेतीन वर्षांनंतर दिपकची मेहनत फळाला आली.तो दिवस त्यांच्यासाठी यशाची सुवर्ण पहाट घेऊन आला. राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला. दिपक देशमुख राज्यात पहिला आला. एव्हढ्या प्रचंड यशाची बातमी मित्रांना कळताच त्यांना गहिवरून आले दिपकच्या यशाचा आनंद त्यांच्या काळजात मनात महावत नव्हता त्याच क्षणी रवि सतिश महेशने पुणे गाठले आणि सर्वमिळून मनसोक्त रडून घेतले पण गावात दिपकच्या यशाची कुणालाच अजून काहीच माहीत नव्हतं.

*ठरवलं* तर वाल्याचा वाल्मिक होवू शकतो हे दिपकने सिद्ध करून दाखवले.राज्यसेवा परीक्षेच्या निमित्ताने जणूकाही दिपकने पुन्हा जन्म घेतला होता.या साडेतीन वर्षांच्या कालावधीत चिंतन मनन करून आणि एकांतवास भोगून दिपकने स्वतःमधे एक आगळावेगळ परिवर्तन घडवून आणले.एक छोट्याशा चुकीमुळे दिपकला फार मोठी किंमत मोजावी लागली होती आणि अथक परिश्रमाने अभ्यास करून यश खेचून आणले त्यामुळे मित्रांना.आकाश ठेंगणे झाले होते संध्याकाळी एका ढाब्यावर जोरदार पार्टी करून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला फटाके फोडले.त्यानंतर तिघही गावी परतल्यावर पंचायतीच्या चौकातही फटाके फुटले,लोक जमले.

“काय झालं?”

“कोणाचं लग्न आहे का?”

कोणीच उत्तर दिलं नाही.

देशमुख वाड्यातूनही विचारणा होवू लागली सुनीताबाईंनी विचारलं, “का फोडताय फटाके ?”पंकज,राहूल ने खांदे उडवून,माहीत नाही म्हणाले” दिपकच नाव कुणाच्याही तोंडातून निघालं नाही.गावात येण्याचा तिघाही मित्रांचा आग्रह तुर्तास दिपकने टाळला.”हो मी गावात तर येईलच आणि काहीही झालं तरी येणारचं महाजन सरांना दिलेल्या रूमालाची गाठ सोडायला पण सध्या नाही.सहा महिने प्रशिक्षण कलेक्टरच ट्रेनिंग आटोपल्यावरच,सध्या कुणाला काहीच सांगू नका कुणाजवळ बोलू नका”,गावकऱ्यांना धक्का कसा द्यायचा हे सर्वांनी ठरवल्यानंतर जो तो आपल्या मार्गी लागलेत.या दरम्यान राहुलचं लग्न ठरलं.देशमुख वाड्यात आनंदाची पर्वणी सुरू झाली राहूलच्या लग्नाची धावपळ सुरू झाली.हिच संधी साधून दिपकला गावात आणायचं सर्वांना धक्का द्यायचा दिपकला कलेक्टर झालेल पाहून सर्वाच अचंबित झाले.आणि मग काय ठरल्याप्रमाणे रवि सतीष महेशने सर्व गावात लायटिंग लावली पताका लावल्या चौकाचौकात फुलांनी फुग्यांनी सजवलेल्या कामानी उभ्या केल्यात आबासाहेब देशमुखांच्या मुलांचं लग्नं आहे म्हणून हि सर्व तयारी चालू आहे असा गैरसमज गावकऱ्यांना झाला होता पण कारण वेगळंच होतं लग्नाचा दिवस उजाडला.राहूल डेप्युटी इंजिनिअर शिवाय आबांचं राजकीय वर्चस्व यामुळे राहूच्या लग्नात त्यांच्या मित्रांची व आबांचा राजकीय परिवार आमदार खासदार मंत्री सरपंच पुढाऱ्यांची गावात तोबा गर्दी पाव्हणेरावळ्यांनी,राजकीय लोकांनी गावात एकच गर्दी केली.गावात केलेली सजावट पाहून अनेकांचे डोळे दिपलेत एकालाही कलेक्टर दिपक देशमुख गावात परत येत असल्याचं दिपक येइपर्यंत कळू दिले नाही.मग काय राहूल‌ घोड्यावर बसला वरात निघाली सारे पाहूणे,नेते पुढाऱ्यांची गर्दी नाचण्यात गुंग होती पुढच्या क्षणी काय होईल कोणाच माहित नव्हते. वरात पारावर‌ येताच एका काळ्या रंगाच्या गाडीने गावात प्रवेश केला. प्रथम गाडी थेट महाजन सरांच्या घरी पोहोचली एक रूबाबदार राजबिंडा देखणा गाडीतून उतरताच साडे तीन वर्षांनंतर परत आलेल्या दिपकला पाहून महाजन सर जगच्याजागी स्तब्ध झाले आपणं काय बघतोय यावर सरांना विश्वास बसत नव्हता कलेक्टर झालेल्या दिपकला पाहून महाजन सरांनी दिपकला कडकडीत मिठी मारली महाजन सर जोरजोरात रडायला लागले त्यांच्या रडण्यामुळे त्यांच्या अवतीभवती गर्दी गोळा झाली दिपकने सरांच्या पायावर डोकं टेकवून आशिर्वाद घेतले सरांनी सर्व साक्षीने औक्षण करून दिपकने बांधलेल्या रूमालाची गाठ सोडली महाजन सरांनी पहिल्यांदाच दिपकच्या डोक्यावर हात ठेवला.

“मला खात्री होती,तू काहीतरी होवून परतशील”तेवढ्यात बाहेर ढोल ताशांचा आवाजात रवि,सतीश महेशने फुलांनी सजवलेली गाडी गावात नेली एकी कडून राहूल च्या लग्नाची वरात निघाली तर दुसरीकडून दिपकची मिरवणूक निघाली दिपक हात उंचावून सर्वाना नमस्कार करत होता.दिपकला पाहून तर गावकऱ्यांना धक्का बसला.साडेतिन वर्षांनंतर दिपक कलेक्टर होवून गावात आला होता.तेव्हा दिपकला पाहून सर्व अचंबित झाले.घोड्यावर बसलेल्या राहूलच्या चेहऱ्याचा मेकअपच उडाला त्याच क्षणी दिपकने राहूलला पाहून जोरदार दंड थोपटले लग्नात आलेल्या गर्दीतील सर्वांच्या चेहऱ्यावर‌ अपराधी भाव एकत्र दिसत होता.वाजतगाजत मिरवणूक देशमुख वाड्याजवळ आली पंकज,राहुल,सुनीताबाई सगळे दारात उभे होते.त्यांना वाटलं राहूलची वरात आली पण ती वरात नव्हती दिपकची मिरवणूक होती.दिपकला पाहून सर्वा गोंधळून गेले डोळ्यावर विश्वास बसेना साडेतीन वर्षांनंतर पहिल्यांदाच दिपकला बघत होते. डोळ्यांत आनंद होता…पण पुढे जाण्याची हिंमत होतं नव्हती.दिपक गाडीत उभा राहून आई,आंबा,पंकज वहिनी सर्वांच्या नजरेला नजर देत हात जोडून पुन्हा दंड थोपटून मिशांना पिळ भरला पण कोणीच काहीच बोलले नाही. दिपकला पाहून आबा तर कोसळलेच जोरदार हंबरडा फोडला साडेतीन वर्षे परिवारापासून दुर राहुन स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं पोरान अभिमानाने आबांची छाती भरून आली.दिपक कलेक्टर झाल्याचा अभिमान आबांच्या चेहऱ्यावर झळकत होता त्याचक्षणी त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चात्तापही होत होता.तसेच इच्छा असतानाही पंकज दिपकजवळ जाऊन त्याची गळाभेट घेऊ शकत नव्हता. दिपकला कलेक्टर झालेल पाहून किरणने तर स्वतःहून तोंड काळे करून घेतले जेव्हढे ही नेते पुढारी लग्नाला आले होते त्यांच्या तर छातीत कळ भरली छाती धडधडायला लागली.चेहरे हिरमुसले लग्नाचा आनंदसोहळा साजरा करण्यावजी सर्वांनी शरमेने मान खाली घातली.जणूकाही कोणी मेल की काय असं रडायला लागले पण एकाचीही हिंमत होतं नव्हती त्यांच्या जवळ जाण्याची.रवि सतीष महेश भान हरवून बेभान होऊन नाचत होते,चौका चौकात फटाके फोडत होते.तर पल्लवी गर्दीत दुर उभी राहून बघत होती दिपकच्या नजरा तिच्या नजरेला भिडल्या.तीन वर्षांचं मौन अपमान त्या नजरेत सामावलेला होता.साडेतीन वर्षांनंतर दिपक तिच्या डोळ्यांना दिसला आणि तिची मान खाली गेली.मिरवणूका ग्रामपंचायतीच्या चौकात गेली लग्नात आणलेली सर्व गर्दी तिथे जमा झाली.

दिपन माईक हातात घेऊन उभा राहिला.“मी दिपक देशमुख…‌हो तोच दिपक ज्याला तुम्ही सर्वांनी बदनाम करून या गावातून बाहेर काढला. ज्याची तुम्ही जिवंतपणी दशक्रिया केली होती तो मी दिपक देशमुख. आज तुमच्या समोर कलेक्टर होऊन उभा आहे.चौक शांत झाला.सारेजण एकत होतें “माझी चुक नसताना माझ्यावर नाही ते आरोप केलेत त्या समिर पाटलाच्या अनौरस औलादान माझ्या परिवारावर माझ्या आबांवर गलिच्छ आरोप केलेत.त्याचा विरोध केला म्हणून तो माझ्यावर तुटून पडला.चुक त्याची असतांना शिक्षा मला भोगावी लागली.माझी तर दशक्रिया विधी करून मोकळे झालेत जिवंतपणी मला मारून टाकले. दुसऱ्याच्या चुकीमुळे माझं घर,माझं नाव,माझी माणसं माझ्यापासून. दुरावलीत पण माझ्या तिघही मित्रांनी मला भक्कम साथ दिली आर्थिक मदत केली त्यांनीच मला उभं केलं माझ्यातली ज्ञान ज्योत पेटवून काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले काहीतरी होण्यासाठी मी पेटून उठलो आणि आज हा *’पेटलेला दिपक’* तुमच्या समोर कलेक्टर होऊन उभा आहे.आज मी कलेक्टर आहे,पण गर्व घेऊन आलो नाही.मी पुर्वी जसा होतो तसाच आजही आहे पण दुःख एकच साडेतीन वर्षांत एकदाही माझी कोणालाही आठवण आली नाही?.

माझी विचारपूस केली नाही मी कुठे आहे जिवंत आहे की नाही याची चौकशीही केली नाही!याच जास्त वाईट वाटतंय.आता मी या गावात कायमचा राहण्यासाठी आलो नाही. ज्या दिवशी माझी दशक्रिया झाली त्या दिवसापासून या गावाशी माझा काही एक संबध राही…

प्रतिक्रिया व्यक्त करा