आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांची अध्यक्षपदी निवड!
पुणे :
दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ , पुणे येथे कविता सादरीकरण व अध्यक्षपदी यासाठी के.एल.पोंदाच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, समाजसेविका अनुपमा जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्य कर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतुने देशात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलची सुरुवात गतवर्षी झाली. जानेवारीत महोत्सवाचे दुसरे वर्ष असून त्या अंतर्गत पुणे येथे काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात महत्वाचे विशेष आकर्षण म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पारंपारिक वेशभूषेत कवी, कवयित्री कविता सादर करणार आहेत. देशभरातून ३०० ते ४०० कवी, कवयित्रींची नोंदणी झाली आहे.
आकर्षक दर्जेदार सन्मान चिन्ह, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे १००० संविधान ग्रंथ व शालेय विद्यार्थ्यांसाठी संविधानमय शालेय पॅड देण्यात येणार आहे. अशा या अतिशय सुंदर काव्य महोत्सवात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षस्थान लाभणार आहे. त्यांची निवड कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विजय वडवेराव सर यांनी अधिकृतरित्या घोषित केली आहे.
त्यामुळे पालघर जिल्हासह, महाराष्ट्रातील साहित्य वर्तृळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुपमा जाधव यांची प्रकाशित पुस्तके –समुद्रसंगीत, वहिवाट,रानझरा, हे काव्यसंग्रह तर, अनुबंध हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच आकाशवाणी मुंबई, नाशिक, पुणे अशा अनेकविध ठिकाणी त्यांनी कविता वाचन, कथाकथन, पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी तीन गितांची निर्मिती केली आहे.
स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत
चला प्रदूषण दूर करु या!
गौरव गीत, अशा गीतांची निर्मिती केली आहे. डहाणू नगरपरिषदेच्या घंटा गाडीवर देखील त्यांचे गीत वाजवले आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांचं आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण कार्यासाठी त्यांना अनेकविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते कशी! कथाकथन, पर्यावरण जनजागृती, पथनाट्य असे अनेकविध उपक्रम त्या राबवित असतात.
खरेच!
अंधाराला तुडवित जे
चालत चालत जातात…
उगवतिच्या वाटा त्यांच्या
पायाखाली येतात…
