*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे* *नवनीत ड्रॉइंग* *स्पर्धेत सुयश*
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ल येथील विद्यार्थ्यांनी नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन २०२५ या चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.
गट क्रमांक १ (इयत्ता पहिली ते तिसरी) या गटामध्ये कु.विहान सपकाळ व कु.युवराज शिरोडकर यांनी उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर विजेतेपद मिळवले.गट क्रमांक २ (इयत्ता चौथी ते सहावी) या गटात कु.हर्षांक टेमकर व कु.स्वराली मुनणकर यांनी विजेतेपद पटकावले. गट क्रमांक ३ (इयत्ता सातवी ते दहावी) या गटामध्ये कु.पार्थ्वी देवजी व कु.दुर्वांक मालवणकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा डिसोजा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख, संचालक श्री प्रशांत नेरूरकर व सेक्रेटरी श्री आनंद परुळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
